Property Tax : मुंबईकरांवर कराचा भार वाढणार? मालमत्ता कर 13 टक्क्यांपर्यंत वाढीचा प्रस्ताव

BMC Property Tax : मुंबई महापालिकेला दर 5 वर्षांनी कर सुधारणा करण्याचा अधिकार आहे. शेवटची कर सुधारणा ही 2015-16 मध्ये झाली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ केली आहे. मुंबईत 3.39 टक्के, ठाण्यात 7.72 टक्के आणि राज्यात सरसरी 4.39 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. सोलापूर महापालिका क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे 10.17 इतकी वाढ करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रेडी रेकनरच्या दरात वाढ केल्यानंतर आता मुंबई महापालिका मालमत्ता कर 13 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. तसा प्रस्ताव करनिर्धारण आणि संकलन विभागाने महापालिका आयुक्तांकडे दिला आहे. त्यामुळे कचरा करानंतर मुंबईकरांना आणखी एका कराचा फटका बसू शकतो.

(नक्की वाचा- Shivsena vs MNS : गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय? शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा)

मुंबईतील मालमत्ता कर 12.5 टक्क्यांवरून 13 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बीएमसी आयुक्तांकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर मुंबईकरांवर वाढीव मालमत्ता कराचा भार पडणार आहे. सुधारित कर नवीन रेडी रेकनर दरांशी जोडले जातील की नाही याबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे. 

(नक्की वाचा-  Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकाला मंजुरी मिळणार का? लोकसभेतील गणित कसं असेल?)

मुंबई महापालिकेला दर 5 वर्षांनी कर सुधारणा करण्याचा अधिकार आहे. शेवटची कर सुधारणा ही 2015-16 मध्ये झाली होती. 2020 मध्ये मालमत्ता कर वाढवला जाणार होता. मात्र कोरोना संकटामुळे कर न वाढवल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला होता.

Advertisement

Topics mentioned in this article