जाहिरात

Ready Reckoner : घराचं स्वप्न महागणार, रेडिरेकनरच्या दरात वाढ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसह अनेक योजनांमुळे राज्याच्या तिजोरीत मोठा खड्डा पडल्याने राज्य सरकारकडून रेडिरेकनरच्या दरात मोठी वाढ करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

Ready Reckoner : घराचं स्वप्न महागणार, रेडिरेकनरच्या दरात वाढ

Ready Reckoner : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसह अनेक योजनांमुळे राज्याच्या तिजोरीत मोठा खड्डा पडल्याने राज्य सरकारकडून रेडिरेकनरच्या दरात मोठी वाढ करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता राज्यात सगळीकडे घरं घेणं महाग होणार आहे. दोन वर्षांपूर्वी रेडिरेकनरचे दर वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता रेडिरेकनरचे दर वाढविण्यात आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईत 3.39 टक्के, ठाण्यात 7.72 टक्के आणि राज्यात सरसरी 4.39 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. सोलापूर महापालिका क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे 10.17 इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या हद्दीतील सदनिका आणि जमिनींच्या किमतीत वाढ होणार आहे. राज्यात दरवर्षी एक एप्रिलला रेडीरेकनरचे नवे दर लागू होतात. या दरानुसार, त्या रकमेवर नागरिकांना मुद्रांक शुल्क भरावे लागते. या नव्या दरवाढीमुळे पालिकांच्या हद्दीतील सदनिका आणि जमिनीच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. 

New Rules: UPI ते GST.. 1 एप्रिलपासून 'हे' 10 नियम बदलणार, तुमच्या खिशावर कसा परिणाम होणार?

नक्की वाचा - New Rules: UPI ते GST.. 1 एप्रिलपासून 'हे' 10 नियम बदलणार, तुमच्या खिशावर कसा परिणाम होणार?

रेडिरेकनर म्हणजे काय?
मोकळी जमीन किंवा सदनिकांसारख्या मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर राज्य सरकारकडून त्या मालमत्तेच्या मूल्याच्या प्रमाणावर स्टँप ड्यूटी घेतली जाते. ही स्टँड ड्यूटी थेट सरकारच्या तिजोरीत जाते. त्यामुळे सरकारची त्याकडे नजर असते. याशिवाय फसवणूक होऊ नये यासाठी सरकारकडून एक व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे. या मालमत्तांचे मूल्य शहर-गावे आणि परिसरानुसार वेगवेगळे असते. सरकारकडून निश्चित केलेल्या या मूल्यांचा विभागवार तक्ता म्हणजे रेडीरेकनर. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: