जाहिरात

आईच्या मृतदेहाजवळ 3 वर्षांचं बाळ अन्..त्या धरणात बोट कशी बुडाली? कॅमेरात कैद झाला घटनेचा संपूर्ण थरार, Video

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये नर्मदा नदीवर असलेल्या बरगी धरणात गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. एमपी टूरिझमचा पर्यटकांनी भरगच्च भरलेली बोट पाण्यात बुडाली.

आईच्या मृतदेहाजवळ 3 वर्षांचं बाळ अन्..त्या धरणात बोट कशी बुडाली? कॅमेरात कैद झाला घटनेचा संपूर्ण थरार, Video
Boat Sinks In Jabalpur Bargi Dam Video

मनिष रक्षमवार, प्रतिनिधी

Jabalpur Boat Accident Video : मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये नर्मदा नदीवर असलेल्या बरगी धरणात गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. एमपी टूरिझमचा पर्यटकांनी भरगच्च भरलेली बोट पाण्यात बुडाली. या भीषण अपघाताचं भायवह दृष्य समोर आलं आहे. आई आणि तिच्या तीन वर्षांच्या बाळाचं मन हेलावून टाकणारं दृष्य पाहून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. अपघाताचे धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या अपघातात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. बचावकार्य अजूनही अविरतपणे सुरू आहे.

बचाव पथकांनी एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला,तेव्हा सर्वात थरारक आणि मन हेलावून टाकणारे दृश्य समोर आले.महिलेच्या मृतदेहाशेजारीच तिचं जवळपास तीन वर्षांचे बाळ सापडलं. या बाळाने 'लाईफ जॅकेट'परिधान केले होते आणि ते आईच्या गळ्याला घट्ट बिलगून होते. हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले.

घटनेचे दृष्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी दिलेल्या माहितीनुसार,अपघात घडल्यानंर शोधमोहीम राबवण्यात आली. मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रियाही सध्या सुरू आहे. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर लगेचच घटनास्थळी उपस्थित असलेले लोक स्वतःला सावरू शकले नाहीत. या घटनेचे दृष्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या अपघातामुळे सुरक्षा नियम आणि खबरदारीच्या उपायांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

नक्की वाचा >> Mumbai-Pune Missing Link: महाराष्ट्रदिनी मिसिंग लिंकचं उद्घाटन, कोणत्या वाहनांना मिळणार प्रवेश? टोल लागणार का?

अपघात नेमका कसा घडला?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी संध्याकाळी 29 प्रवासी आणि दोन कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एक 'क्रूझ बोट'अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे उलटली. सोसाट्याचा वारा आणि उंच लाटांमुळे बोटीचा तोल गेला.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की,प्रवाशांनी कर्मचाऱ्यांकडे बोटीला किनाऱ्याच्या दिशेने नेण्याची विनंती केली होती. परंतु कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे हा भीषण अपघात घडला. पर्यटन मंत्री धर्मेंद्र भाव सिंह लोधी यांनी म्हटलंय की, सुरुवातीला चार मृतदेह सापडले होते. मात्र त्यानंतर आणखी पाच मृतदेह हाती लागल्याने मृतांचा आकडा नऊवर पोहोचला आहे.अद्यापही बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके सक्रियपणे कार्यरत आहेत.

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा >> HSC Result 2026 Date : सर्वात मोठी बातमी! 'या' तारखेला लागणार बारावीचा निकाल, कुठे पाहता येणार? वाचा डिटेल्स

24 जणांची केली सुटका 

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,24 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.यापैकी काही जण त्यांच्या घरी परतले आहेत,तर काही जखमींवर सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. राखी सोनी,विकी सोनी, समृद्धी सोनी,आराध्या सोनी,मोहित नामदेव,अनामिका सोनी,रियाझ हुसेन,तनिष्क वास,तनिष्का वास आणि ज्युलियस मॅसी यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.सुरक्षित घरी परतलेल्यांमध्ये इनिया, के. पूर्वी थरन,मनोज वास,कियान वर्मा,रोशन आनंद वर्मा,सरिता वर्मा,वृंदा आणि महेश पटेल यांचा समावेश आहे. इतर सुरक्षित व्यक्तींमध्ये छोटे लाल गौड,अंशिका वास, मंजू खडगा (काठमांडू),जफर, सिया मॅसी आणि करण वर्मा यांचा समावेश आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com