अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
HSC Result 2026 Date Announced : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बारावीचा निकाल 2 मे 2026 रोजी जाहीर केला जाणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून याबाबतचं नोटिफीकेशन जारी करण्यात आलं आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वी च्या परीक्षेला 14 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांना आता 2 मे रोजी निकाल पाहता येणार आहे. डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाईटवर निकालाबाबतचे मोठे संकेत देण्यात आले होते. mahahsscboard.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे.
"Class 12th Result 2026 Coming Soon",असा मेसेज डिजी लॉकरच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आला होता. निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं संकेत या मेसेजद्वारे देण्यात आले होते. हा निकाल मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो,अशी माहितीही समोर आली होती.
नक्की वाचा >> Dombivli News: डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटीलचं 12 वर्षांपूर्वीचं कांड उघड, तरुणाची हत्या, बारवी डॅम अन्..
या वेबसाईट्सवरही निकाल दिसण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार,बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी खाली दिलेल्या वेबसाईट्सवर निकाल पाहू शकतात, अशी
1) mahresult.nic.in
2) hscresult.mkcl.org
3) results.digilocker.gov.in
4) mahahsscboard.in
नक्की वाचा >> Pune News: पुणे हादरलं! प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने केले सपासप वार, कारण ऐकून अख्ख कुटुंब हादरलं
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी या गोष्टींची काळजी घ्यावी. हॉल तिकिटवर असलेला त्यांचा बैठक क्रमांक आणि अर्जावरील आईच्या नावाची असलेली नोंद पाहावी. विज्ञान,कला,वाणिज्य आणि व्यावसायिक शाखांचे निकालही एकाच वेळी जाहीर केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मागील वर्षी विज्ञान शाखेचा निकाल 97.35 टक्के लागला होता. यावर्षी निकालाचा टप्पा वाढणार असल्याची चर्चा शैक्षणिक क्षेत्रात रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world