Mumbai-Pune Expressway Missing Link: महाराष्ट्र दिनानिमित्त बहुप्रतिक्षीत असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकापर्ण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडलं.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही या मिसिंग लिंकचं उद्घाटन केलं. जवळपास 6695 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या मिसिंग लिंकमुळे 6 किमीचं अंतर कमी होणार असून प्रवाशांची 30 मिनिटांची बचतही होणार आहे.
काय आहे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक?
हा नवीन मार्ग मुंबईहून खोपोली लोणावळ्याजवळ असलेल्या कुसगावला जोडतो. हा मार्ग सुरु झाल्यानंतर जुन्या घाट सेक्शनमधील जवळपास 70 टक्के ट्रॅफिक डायव्हर्ट होण्याची अपेक्षा आहे.
अंतर कमी, वेळ आणि इंधनाची बचत
नव्या लिंकने मुंबई-पुणे मधील अंतर जवळपास 6 किमीने कमी होईल. सरळ आणि सोपा मार्ग मिळाल्याने प्रवाशांची जवळपास 30 मिनिटांचं वेळ वाचणार आहे. त्यामुळे इंधन बचतही होईल. या प्रकल्पात 23.5 ते 23.75 मीटर लांब बोगदा बनवण्यात आले आहेत. हे आशियातील सर्वात मोठ्या बोगद्यांच्या यादीत सामील झाले आहेत. हा प्रकल्प गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार असल्याची चर्चा आहे.
नक्की वाचा >> HSC Result 2026 Date : सर्वात मोठी बातमी! 'या' तारखेला लागणार बारावीचा निकाल, कुठे पाहता येणार? वाचा डिटेल्स
दोन बोगदे, 8 लेनची क्षमता
या प्रकल्पात दोन ट्वीन टनेल बनवण्यात आले आहेत. पहिला बोगदा 8.92 किमी लांब तर दुसरा बोगदा 1.75 किमी लांब आहे. दोन्ही बोगद्यांची क्षमता 8 लेन इतकी आहे. ज्यामध्ये प्रत्येक दिशेला 4 लेन आहेत. आतमध्ये व्हेंटिलेशन, आधुनिक लायटिंग आणि एमरजन्सी एक्झिटची मोठी सुविधा आहे.
LIVE । रायगड यशवंतराव चव्हाण मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग क्षणतावाढ अंतर्गत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा - लाईव्ह https://t.co/m1naSFkboc
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 1, 2026
टायगर व्हॅलीवर मोठा केबल स्ट्रे ब्रिज
या मिसिंग लिंकचं खास वैशिष्ट्य म्हणजे टायगर व्हॅलीवर बनवलेलं 650 मीटर लांब केबल-स्ट्रे ब्रिज आहे. याचे खांब 182 ते 184 मीटर उंच आहेत. हे 252 किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या हवेलाही सहन करू शकतात. याचं मुख्य स्पॅन 305 मीटर आहे.
नक्की वाचा >> Dombivli News: डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटीलचं 12 वर्षांपूर्वीचं कांड उघड, तरुणाची हत्या, बारवी धरण अन्
पर्यटन आणि व्यापार वाढणार
या मिसिंग लिंकमुळे लोहगढ,विसापूर किल्ला आणि कार्ला गुहेसारख्या पर्यटन स्थळांपर्यंत पोहचणं खूप सोपं होईल. खूप चांगल्या कनेक्टिव्हीटीमुळे मुंबई आणि पुणे शहरातील व्यापार वाढीलाही चालना मिळेल.
टोल आणि वाहन नियम
एवढ्या मोठ्या प्रकल्पानंतरही प्रवाशांना टोल लागणार नाही. खालापूर आणि तळेगाव टोल प्लाझावरच टोल लागू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात कार आणि बसेस या मार्गाचा वापर करू शकतील. तर अवजड आणि धोकादायक सामान नेणाऱ्या गाड्यांना जुन्या घाटानेच प्रवास करता येणार.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world