मुंबईला स्वप्नांची मायानगरी का म्हणतात? घर सोडून मुंबईत गेलेल्या तरुणानं करून दाखवलं, Video पाहून हिंमत वाढेल

सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. पण घर सोडून मुंबईत आलेल्या एका तरुणासोबत असं काही घडलं, जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Man Inspirational Video
मुंबई:

Mumbai Boy Inspiration Video Viral : सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. पण घर सोडून मुंबईत आलेल्या एका तरुणासोबत असं काही घडलं, जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, कधी शेतांच्या मधोमध उभा असलेला एकटा मुलगा,डोळ्यांत भीती आणि मनात प्रश्न...‘काय होईल?' पण काही वर्षांनंतर तोच चेहरा मोठ्या-मोठ्या पोस्टर्सवर झळकत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून लाखो लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तरुणाने शांत डोक्याने घेतलेला एक निर्णय अनेकांचा धेर्य वाढवत आहे. 

या व्हायरल व्हिडिओची सुरुवात ब्लॅक अँड व्हाईट फ्रेमने होते.एक अरुंद पायवाट,चारही बाजूंना शेती आणि मध्ये उभा असलेला एक तरुण..चेहऱ्यावर संकोच आणि डोळ्यांमध्ये अनिश्चितता स्पष्ट दिसते. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की,‘घरून मुंबईला पळून जातोय,काय होईल?',असा प्रश्न स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या मनात दडलेला असतो.

नक्की वाचा >> Devendra Fadnavis: "अकोल्यातील लाडक्या बहिणींसाठी गूड न्यूज...", प्रचारसभेत CM फडणवीसांचं सर्वात मोठं विधान!

तरुणाचं आयुष्य कसं बदललं, पाहा तो व्हायरल व्हिडीओ

काही क्षणांतच या व्हिडीओचा रंग बदलतो म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट फ्रेम कलरफूल होते. याचा अर्थ असा की, आता त्या मुलाचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असतो.स्टायलिश आऊटफिटमध्ये एका स्टोअरच्या आत त्याचे मोठे पोस्टर्स डिजिटल स्क्रीनवर झळकल्याचं पाहायला मिळत आहे. कुठे तो रॅम्प वॉक करताना,तर कुठे कॅमेऱ्याच्या फ्लॅश लाईट्समध्ये फोटोशूट करताना दिसतो. प्रत्येक फ्रेमकडे पाहिलं की असं वाटतं, हा प्रवास खरंच सोपा नव्हता. पण अशक्यही नव्हता. 

Advertisement

नक्की वाचा >> मुलीनं देशाची शान उंचावली, अख्ख्या गावाने रेल्वे स्टेशनवर 'असं' स्वागत केलं..मजुर बापाचे डोळे पाणावले!

सोशल मीडियावर भावनांचा पूर (मॉडेलची यशोगाथा) 

1 जानेवारीला शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 1.62 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत.व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.एका यूजरने म्हटलंय,‘ही माझीच कहाणी आहे. अन्य एकाने कमेंट करत म्हटलंय की,‘फक्त एक धाडसी पाऊल हवं.तर काही जणांनी या तरुणाचं स्वागत केलं आहे. हा व्हिडिओ फक्त एका मॉडेलच्या यशाबाबत नाही, तर तर तो व्हिडीओ लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. जे लोक छोट्या शहरांमधून बाहेर पडून मोठ्या शहरात स्वप्न पूर्ण करतात.