राहुल कांबळे, नवी मुंबई
नवी मुंबईत इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील बेलापूर विभागातील शहाबाज गावातील तीन मजली इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली. ढिगाऱ्याखालून 20 ते 25 वर्षाच्या वयातील तीन तरुणाचे मृतदेह एनडीआरएफच्या टीमने बाहेर काढले आहेत.
एनडीआरएफ, महापालिका आणि अग्निशामक दलाच्या टीमकडून बचावकार्य सुरु होते. मृतांमध्ये सिराज अन्सारी, मीरा अन्सारी, मोहम्मद मिराज अल्ताफ हुसेन अशी या तरुणांचा समावेश आहे. दुर्घटनेत 40 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. सध्या एनडीआरएफ आणि महापालिकेच्या जवानांना तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
#WATCH नवी मुंबई (महाराष्ट्र): शाहबाज गांव में तीन मंजिला इमारत 'इंदिरा निवास' ढह गई है। कई लोग मलबे में फंसे हुए हैं। मौके पर NDRF, पुलिस, अग्निशमन दल और नगरपालिका के अधिकारी पहुंचे हैं। बचाव कार्य जारी है।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 27, 2024
अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/oNkccmXiS1
रिक्षावाल्यामुळे वाचले अनेकांचे प्राण
रात्री एक वाजेच्या सुमारास एक रिक्षा भाडं घेऊन या ठिकाणी आली होती. त्या रिक्षा ड्रायव्हरला काहीतरी पडण्याचा आवाज आला. त्याच्यानंतर त्याने खाली असलेल्या सलूनमधील दोन-तीन लोकांना उठवलं आणि घटना सांगितली. सलूनमधील काही लोक इमारतीमध्ये जाऊन सगळ्यांना दरवाजे वाजवून उठवू लागले. त्यातील रूम नंबर 203 यामध्ये असणारे तीन तरुणांनी दरवाजा उघडला नाही.
इमारतीतील सर्व नागरिक आहे बाहेर पळाले आणि आपला जीव वाचवला. काही वेळातच इमारत कोसळली. सकाळी 6 वाजेपासून एनडीआरएफ आणि नवी मुंबई महानगरपालिका अग्निशामक दलाच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली होती. एकूण तीन मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफ आणि महानगरपालिकेच्या पालिकेच्या जवानांना यश मिळाले आहे.
दुर्घटनेबाबत माहिती देताना नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी म्हटलं की, इमारत आज पहाटे 5 वाजण्यापूर्वी कोसळली. सेक्टर-19, शाहबाज गावात ही जी+3 इमारत आहे. या इमारतीत 52 लोक राहत होते. तिघांचा यामध्ये मृत्यू झाला तर इतर सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
कैलास शिंदे पुढे म्हणाले, एनडीआरएफची टीम बचाव कार्य करत आहे. वाचवण्यात आलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. इमारत 10 वर्षे जुनी आहे. चौकशी सुरू असून इमारत कोणाच्या मालकीची आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world