जाहिरात

Nagpur violence : नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या घरावर अखेर बुलडोझर 

फहीम खान याला मनपाकडून नोटीस पाठवण्यात आली होती, त्यानंतर आज त्याच्या घरावर कारवाई करण्यात आली.

Nagpur violence : नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या घरावर अखेर बुलडोझर 

Bulldozer on Faheem Khan's house : उत्तर प्रदेशातील बुलडोझर कारवाईची देशभरात मोठी चर्चा झाली. गेल्या वर्षभरात उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये बुलडोझर कारवाई करण्यात आल्याने विरोधकांकडून योगी आदित्यनाथ यांच्यावर 'बुलडोझरराज' अशी टीका केली जाते. दरम्यान नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर अशीच एक घटना समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खान याच्या घरावर आज सकाळी बुलडोझर चालवण्यात आला. यशोधरानगरच्या संजय बाग कॉलनीत राहणारा फहीम खान याने घर बांधताना मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केल्याने मनपा प्रशासनाकडून त्याला नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज त्याच्या घरावर बुलडोझर चालवून ही कारवाई करण्यात आली. फहीम खानचे कुटुंबीय काल 23 मार्चलाच घर सोडून गेल्याची माहिती आहे. 

Kunal Kamra : एकनाथ शिंदेंवरच नाही तर पंतप्रधान मोदींवरही गाणं; कुणाल कामराची 'ही' सहा गाणी व्हायरल

नक्की वाचा - Kunal Kamra : एकनाथ शिंदेंवरच नाही तर पंतप्रधान मोदींवरही गाणं; कुणाल कामराची 'ही' सहा गाणी व्हायरल

फहीम खानवर काय आहे आरोप?
नागपूर हिंसाचारासंदर्भातील पोलिसांच्या एफआयआरमधून फहीम शमीम खान हाच हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पक्षायचा शहराध्यक्ष आहे. नागपूरमधील हिंसाच्याराच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी 51 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फहीम शमीम खानच्या नेतृत्वात हे सगळं झाल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. सोमवारी सगळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाज प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन केले. त्याबाबत फहीम खाने याने 40-50 जणांना बेकायदेशीपणे जमा केले, असा त्याच्यावर आरोप आहे. फहीद खाने याने मुस्लीम धर्मांच्या लोकांना संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास एकत्र जमवून धार्मिक वाद निर्माण होईल ह्या उद्देशाने कट रचला. जवळपास 500 ते 600 मुस्लीम लोक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे जमा झाले. पोलिसांना सर्वांना जमा न होता आपापल्या घरी सुरक्षितरित्या निघून जावे असे आवाहन केले. मात्र जमावातील कुणीही काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते, त्यावेळी जमलेला जमाव एकमेकांना दंगा करण्याची चिथावणी देत मोठमोठ्याने घोषणा देऊ लागले. 'अभी पुलीस को दिखाते है. इनको और किसी भी हिंदू को छोडने का नही. इन्होने ही सारा खेल किया है. इन्होनेही ये सब किया है.' अशी धमकी पोलिसांसमोर जमावाने दिली. त्यानंतर जमाव अधिक प्रक्षोभित झाला.