महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर आमदारांचा शपथविधी देखील अंतिम टप्प्यात आहे. आता फडणवीस सरकारचे मंत्री कोण असतील याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांचे प्रगती पुस्तक हायकमांडने मागवलं होते. त्यानुसार शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार झाले आहे. राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिनसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेनं तयार केले आहे.
शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री नापास झाले आहेत. माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दूल सत्तार यांचा यात समावेश आहे. त्यामुळे संजय राठोड आणि अब्दूल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे 5 आमदार पास झाले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शिवसेनेचे मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जून खोतकर आणि विजय शिवतारे हे पास झाले आहेत. महायुतीमध्ये शिवसेनेला 13 ते 14 मंत्रिपदे मिळणार असल्याची शक्यता आहे. या पैकी 10 ते 12 मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात पास झालेले आणि मंत्रिपदाची शपथ घेणार संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.
ट्रेंडिंग बातमी - एकनाथ खडसेंचे फडणवीसांबाबत मोठे वक्तव्य, मोठी घडामोड होणार?
शिवसेनेचे संभाव्या मंत्री
- गुलाबराव पाटील
- उदय सामंत
- दादा भूसे
- शंभूराजे देसाई
- तानाजी सावंत
- दिपक केसरकर
- भरतशेठ गोगावले
- संजय शिरसाट
- प्रताप सरनाईक
- अर्जून खोतकर
- विजय शिवतारे