राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपुरात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा येथे पार पडणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोणते आमदार शपथ घेणार आहे, हे आता हळूहळू समोर येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विभागवार विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. प्रत्येक विभागाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी महायुतीतील पक्षांनी प्रयत्न केला आहे. विभागवार मंत्रिमंडळ कसं असेल यावर एक नजर टाकूया.
मुंबई-ठाणे
- आशिष शेलार
- मंगलप्रभात लोढा
- प्रताप सरनाईक
- गणेश नाईक
(नक्की वाचा- शिंदेंचे मंत्रिमंडळातील शिलेदार ठरले; शिवसेनेकडून हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, 3 मंत्र्यांना डावललं)
कोकण
- नितेश राणे
- उदय सामंत
- भरत गोगावले
- अदिती तटकरे
- योगेश कदम
उत्तर महाराष्ट्र
- दादा भुसे
- गुलाबराव पाटील
- नरहरी झिरवाळ
- गिरीश महाजन
- जयकुमार रावल
- संजय सावकारे
- माणिकराव कोकाटे
(नक्की वाचा- Narhari Zirwal : सरपंच, आमदारकीची हॅटट्रिक आता मंत्री... नरहरी झिरवाळ यांची राजकीय कारकीर्द)
पश्चिम महाराष्ट्र
- शिवेंद्रसिंहराजे भोसले
- माधुरी मिसाळ
- राधाकृष्ण विखे पाटील
- शंभुराजे देसाई
- प्रकाश अबिटकर
- चंद्रकांत पाटील
- दत्तमामा भरणे
- हसन मुश्रीफ
- जयकुमार गोरे
मराठवाडा
- पंकजा मुंडे
- धनंजय मुंडे
- अतुल सावे
- संजय शिरसाट
- बाबासाहेब पाटील
- मेघना बोर्डीकर
विदर्भ
- चंद्रशेखर बावनकुळे
- आशिष जैस्वाल
- संजय राठोड
- अशोक उईके
- आकाश फुंडकर
- पंकज भोयर