जाहिरात

Narhari Zirwal : सरपंच ते आमदारकीची हॅटट्रिक आता मंत्रिपदी वर्णी... नरहरी झिरवाळ यांची राजकीय कारकीर्द

Narhari Zirwal Profile : दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ 2009 साली अवघ्या 149 मतांनी पराभूत झाले होते. या पराभवातून सावरून त्यांना नव्याने सुरुवात केली, त्यानंतर मागे सलग तीन वेळा आमदार झाले आहेत.

Narhari Zirwal : सरपंच ते आमदारकीची हॅटट्रिक आता मंत्रिपदी वर्णी... नरहरी झिरवाळ यांची राजकीय कारकीर्द

 प्रांजल कुलकर्णी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नरहरी झिरवाळ शपथ घेणार हे निश्चित झाले आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आमदारांना फोन जाण्यासा सुरुवात झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ यांची कारकीर्द चर्चेत राहिले. मात्र आता नरहरी यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वनारे गावचे सरपंच ते मंत्री असा नरहरी झिरवाळ यांचा प्रवास राहिला आहे. ग्रामीण भागातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नरहळी झिरवाळ यांनी विविध कार्यकारी संस्थांचे संचालक, चेअरमन पदे भुषवली.

(नक्की वाचा-  शिंदेंचे मंत्रिमंडळातील शिलेदार ठरले; शिवसेनेकडून हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, 3 मंत्र्यांना डावललं)

दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ 2009 साली अवघ्या 149 मतांनी पराभूत झाले होते. या पराभवातून सावरून त्यांना नव्याने सुरुवात केली, त्यानंतर मागे सलग तीन वेळा आमदार झाले आहेत. यंदा त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे. 

( नक्की वाचा : PM Modi Speech : 'काँग्रेसनं वेळोवेळी संविधानाची शिकार केली', पंतप्रधानांनी सर्व इतिहासच सांगितला )

नरहरी झिरवाळ यांचा राजकीय प्रवास

  • 1984 - सरपंच, वनारे गाव 
  • विविध कार्यकारी संस्थेचे संचालक ,चेअरमन
  • 1995 - दिंडोरी विधानसभा पोटनिवडणुकीत जनता दलकडून विधानसभा निवडणूक, पराभूत
  • 1997 - जनता दलाकडून पंचायत समिती सदस्य, उपसभापती. कोशिंबे पंचायत समिती गण. 
  • 1999 - दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष
  • 2002 - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य कोशिंबे गट 
  • 2004 - आमदार, दिंडोरी  विधानसभा
  • 2009 - दिंडोरी लोकसभा पराभव राष्ट्रवादी
  • 2009 - विधानसभा 149 मतांनी निसटता पराभव
  • 2014, 2019, 2024 - सलग आमदार, राष्ट्रवादी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com