अटल सेतूसाठी आता मनसे मैदानात; सेतूच्या सुरक्षिततेसाठी उघडली मोहीम

MNS for Campaign : अटल सेतूला कोणाताही धोका निर्माण होऊन नये यासाठी 'ओव्हरलोड वाहतूक बंद करा, अटल सेतू वाचवा' अशी मोहीम मनसेने सुरु केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अरबी समुद्रात उभारलेला शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या रस्याला भेगा पडल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी निदर्शनास आणून दिलं होतं. त्यानंतर पंतप्रधानांच्या या ड्रीम प्रोजेक्टवरुन विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. या प्रकरणावर MMRDA ने स्पष्टीकरण देत म्हटलं की, अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून अफवांवर विश्वास ठेवू नका. मात्र काँग्रेसनंतर आता मनसेही अटल सेतू संदर्भात आक्रमक भूमिक घेतली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अटल सेतूवर नियमबाह्य पद्धतीने ओव्हरलोड वाहतूक सुरु आहे. यामुळे या पुलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस प्रदीप वाघमारे यांनी मांडला आहे.

(नक्की वाचा- PM मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला तडा, 5 महिन्यांमध्येच अटल सेतूला पडल्या भेगा?)

ओव्हरलोड वाहतूक म्हणजे वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेणे आणि नियमांचे उल्लंघन करत मालाची वाहतूक करणे. मल्टी एक्सल ट्रेलरच्यामार्फत नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेली ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. वाहन चालकांकडून आर्थिक लाभ मिळवण्याकरता ठेकेदारांकडून ही ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. मात्र यामुळे पुलाच्या स्ट्रक्चरला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा मनसेचा आहे. 

(नक्की वाचा- बेशिस्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचा दणका; उशीरा येणाऱ्यांना लागणार हाफ डे)

अटल सेतूला कोणाताही धोका निर्माण होऊन नये यासाठी 'ओव्हरलोड वाहतूक बंद करा, अटल सेतू वाचवा' अशी मोहीम मनसेने सुरु केली आहे. शिवाय अटल सेतूच्या बांधकामाकरिता एमएमआरडीएने पॅकेज 1, 2 आणि 3 साठी निवडलेल्या ठेकेदारांनी जवळपास 100 कोटींचा ओडीसी फीज घोटाळा केल्याचा आरोपही मनसेने केला.

Advertisement
Topics mentioned in this article