Ashok Kharat: कॅप्टन' खरातची चिंधीगिरी! कोट्यवधींची माया पण गरीब शेतकऱ्याला फसवलं; खळबळजनक आरोप

Captain Ashok Kharat: अशोक खरातने शिर्डीतील 4 एकर भूखंडावर कष्ट करणाऱ्या शेतकरी बाबासाहेब गोंदकर यांचा गव्हाचा पीक दमदाटी करून पळवल्याचा आरोप आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, शिर्डी

नाशिकच्या बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहे. शिर्डीतील एका मोक्याच्या ठिकाणच्या जमिनीवरून खरातने एका स्थानिक शेतकऱ्याची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

शिर्डीतील शेतकऱ्याची फसवणूक

अशोक खरातने सुमारे 4 वर्षांपूर्वी शिर्डीत 4 एकर शेतजमीन खरेदी केली होती.  ही जमीन कसण्यासाठी त्याने स्थानिक शेतकरी बाबासाहेब गोंदकर यांना दिली होती. गोंदकर यांनी मोठ्या आशेने आणि स्वखर्चाने या जमिनीवर गव्हाची पेरणी केली होती. गहू कापणीला आला असता, खरातने आपली माणसे पाठवून गोंदकर यांना दमदाटी केली. त्यांच्या कष्टाचा कोणताही मोबदला न देता, खरातने घाईघाईने सर्व गहू काढून नेल्याचा आरोप गोंदकर यांनी केला आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Ashok Kharat: अशोक खरात प्रकरण; रूपाली चाकणकरांच्या व्हायरल व्हिडीओ खळबळ, राजकारण पेटलं)

'कॅप्टन'चा दबदबा आणि दहशतीचे साम्राज्य

नाशिकप्रमाणेच अहिल्यानगर जिल्ह्यातही खरातचे मोठे राजकीय आणि सामाजिक लागेबांधे असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.  "मी रात्रंदिवस राबलो, खत-पाण्याचा खर्च केला, पण काढणीच्या वेळी खरातने गुंड पाठवून माझे पीक पळवले," असे रडत रडत बाबासाहेब गोंदकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ही जमीन शिर्डीतील अत्यंत महागड्या परिसरात असल्याने, खरातने तिथे मोठी गुंतवणूक केली असल्याचे समजते.

(नक्की वाचा-  Nashik News: महाराष्ट्राची एपस्टीन फाईल! सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर हल्लाबोल; 'कॅप्टन' खरात प्रकरणी गंभीर आरोप)

तपासाची व्याप्ती वाढणार?

बलात्कार प्रकरणाचा तपास करत असतानाच आता पोलिसांना खरातच्या बेनामी मालमत्ता आणि जमिनींच्या व्यवहारांचीही चौकशी करावी लागणार आहे. ज्योतिष आणि अध्यात्माच्या नावाखाली खरातने अनेक ठिकाणी जमिनी लाटल्याचा किंवा शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त होत आहे. नाशिक क्राईम ब्रांचसोबतच आता आर्थिक गुन्हे शाखा (EOW) या मालमत्तांच्या व्यवहारांची चौकशी करण्याची शक्यता आहे.
 

Topics mentioned in this article