जाहिरात

मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, रविवारचे वेळापत्रक एकदा बघाच

रविवारी 1 सप्टेबरला हा मेगाब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान हा मेगाब्लॉक असेल.

मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, रविवारचे वेळापत्रक एकदा बघाच
मुंबई:

महिन्याच्या पहिल्याच दिवशी उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रविवारी 1 सप्टेबरला हा मेगाब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान हा मेगाब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रविवारी जर घराबाहेर पडणार असाल तर रविवारचे लोकलचे वेळापत्रक पाहून घरा बाहेर असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 मध्य रेल्वेवर रविवारी 1 सप्टेबर 2024 रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 11.05 वाजता हा मेगाब्लॉक सुरू होईल. तो दुपारी 3.55 पर्यंत असेल. या मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी वरून माटुंगा ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावरील सेवा ही जलद मार्गावरून वळण्यात येणार आहे. या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकात थांबतली. मुलुंड पुढे या लोकल पुन्हा डाऊन धिम्या मार्गावरून धावणार आहेत. 

ट्रेंडिंग बातमी -  चॉकलेट चोरल्याचा संशय, तिसरीच्या मुलाला झाडाला बांधलं, पुढे मात्र...

मध्य रेल्वेवरील या मेगाब्लॉक मुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा ही 15 मिनिटे उशिराने असेल. लोकल या पंधरा मिनिटे उशिराने धावतील. मध्य रेल्वे प्रमाणेच हार्बर मार्गावर ही मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. कुर्ला ते वाशी दरम्यान हा मेगाब्लॉक असेल. सकाळी 11.10 मेगाब्लॉकला सुरूवात होईल. संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. हा ब्लॉक अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजा टर्मिनस ते पनवेल, बेलापूर, वाशी या लोकल सेवा बंद  असतील. 

ट्रेंडिंग बातमी - 'माफ कर आई, मी तुझी हत्या केली' लेकानं आईचा खून केला अन्...

हार्बर रेल्वे मार्गवर जरी मेगाब्लॉक घेण्यात आला असला तरी  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कुर्ला आणि पनवेल-वाशी या मार्गावर काही विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होणार आहे. या लोकल मुळे काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळेल. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे वाशी नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
Ajit Pawar Speech : साडी, ब्लाऊज आणि पेटीकोट... महिला मेळाव्यात अजित पवारांचं तुफान भाषण
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, रविवारचे वेळापत्रक एकदा बघाच
pune crime news robbery of jewelery worth rs 5 lakh looted from elderly couple-in hadapsar cctv footage
Next Article
CCTV Footage : एका वडापावमुळे गेले 5 लाखांचे दागिने, पुण्यात वृद्ध दाम्पत्यासोबत काय घडलं?