जाहिरात

'या' तारखेला मध्य रेल्वेचा Mega Block! कल्याण-ठाणे दरम्यान मोठा बदल, प्रवास करण्याआधीच नवं टाईमटेबल वाचा

 मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रविवारी 21 डिसेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. वाचा सविस्तर माहिती.

'या' तारखेला मध्य रेल्वेचा Mega Block! कल्याण-ठाणे दरम्यान मोठा बदल, प्रवास करण्याआधीच नवं टाईमटेबल वाचा
Central Railway Mega Block On Sunday
मुंबई:

Central Railway Sunday Mega Block Update : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रविवारी 21 डिसेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेवर 09.00 ते 13.00 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.  अप मेल किंवा एक्स्प्रेस गाड्या कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील व त्या गंतव्य स्थानकावर जवळपास 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील, अशी माहिती मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या ब्लॉकबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

  • 11010 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस 
  • 11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस 
  • 17611नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस 
  • 12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
  • 13201 राजगीर – लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस
  • 17221 काकीनाडा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 
  • 12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस 
  • 12140 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस 
  • 22160 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस 
  • 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस 
  • 12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 
  • 12321 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल
  • 12812 हाटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 
  • 11014 कोयंबतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 

नक्की वाचा >> छत्रपती संभाजीनगरमध्ये युती-आघाड्यांची राजकीय समीकरणं बदलणार? पक्ष फुटीनंतर कोणाची ताकद वाढली? वाचा सविस्तर

डाऊन मेल किंवा एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्जन

डाउन मेल किंवा एक्स्प्रेस गाड्या ठाणे व कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व त्या जवळपास 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

  • 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर एक्सप्रेस 
  • 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोंडा गोदान एक्सप्रेस
  • 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर पवन एक्सप्रेस 
  • 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस 

मेमू (MEMU) गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन किंवा शॉर्ट ओरिजिनेशन 

61003 वसई रोड – दिवा मेमू 09.50  वाजता वसई रोड येथून सुटणारी मेमू गाडी कोपर येथे 10.31  वाजता शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. 
61004 दिवा – वसई रोड मेमू ही मेमू गाडी दिवा ऐवजी कोपर येथून 11.45  वाजता शॉर्ट ओरिजिनेट होऊन वसई रोड येथे 12.30 वाजता पोहोचेल. पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर (पोर्ट मार्ग वगळून) 11.05  ते 16.05 वाजेपर्यंत असणार आहे.

नक्की वाचा >> 'KISS कर नाहीतर गोळी मारेन', प्रसिद्ध धबधब्यावर कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थीनीसोबत भयंकर घडलं

हार्बर मार्गावरील सेवा

पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील 10.33 ते 15.49 वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा तसेच 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील 09.45 ते 15.12 वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील. 

ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा

पनवेल येथून ठाणेकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील 11.02 ते 15.53 वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा तसेच 
ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील 10.01 ते 15.20 वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील. 

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्यात येतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध राहतील.
ब्लॉक कालावधीत बेलापूर किंवा नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध राहतील.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com