जाहिरात

Central Railway: मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत; लोकल उशीराने, प्रवाशांना मनस्ताप

Central Railway: मध्य रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाली असून, तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

Central Railway: मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत; लोकल उशीराने, प्रवाशांना मनस्ताप

Mumbai News: ऐन सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना आजही मध्य रेल्वेच्या उशिरा धावणाऱ्या लोकलचा फटका बसत आहे.  लांब पल्ल्याच्या गाड्यांना मार्ग दिला जात असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने सुरु आहे. प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

लांब पल्ल्याच्या गाड्यांना आधी सोडलं जात असल्याने कर्जतहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशीराने धावत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद लोकल सेवा 20  ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर धिम्या लोकल सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने असल्याने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की, लवकरच वाहतूक पूर्वपदावर येईल. मात्र सकाळच्या वेळी लोकलचं वेळापत्रक चुकल्याने प्रवाशाना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com