Central Railway Scrap Sale: भंगार विकून मध्य रेल्वे मालामाल, कोट्यवधींची केली कमाई

मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्याच तिमाहीत भंगार विक्रीतून तब्बल 136.10 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 'मिशन - झिरो स्क्रॅप स्टेटस' अंतर्गत ही गेल्या 5 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

जाहिरात
Read Time: 2 mins

टाकाऊ वस्तूंतून महसूल निर्मितीच्या उद्देशाने मध्य रेल्वेने सुरू केलेल्या ‘मिशन - झिरो स्क्रॅप स्टेटस' अभियानाला मोठे यश मिळाले आहे. चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्याच तिमाहीत (एप्रिल ते जून) मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून 136.10 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल गोळा केला आहे.

रेल्वेच्या पाचही विभागांमध्ये आणि विविध कार्यशाळांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबवून टाकाऊ भंगाराचे रूपांतर मौल्यवान महसुलात करण्यात आले आहे. ही गेल्या 5 वर्षांतील पहिल्या तिमाहीची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. विशेष म्हणजे, मागील आर्थिक वर्षाच्या (2025-26) पहिल्या तिमाहीतील 71.94 कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत यंदा तब्बल 89% ची वाढ नोंदवली गेली आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)

मुंबई विभाग अव्वल

  • मुंबई विभाग: 22.43 कोटी रुपये (सर्वोच्च)
  • भुसावळ विभाग: 20.44 कोटी रुपये
  • नागपूर विभाग: 19.98 कोटी रुपये
  • पुणे विभाग: 18.19 कोटी रुपये
  • सोलापूर विभाग: 6.44 कोटी रुपये
  • कार्यशाळा व युनिट्स (परळ, माटुंगा इत्यादी): 48.62 कोटी रुपये

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या भीतीने जिलबीने बदलला रंग; नेमकं काय घडलंय?)

या अभियानाबाबत माहिती देताना मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले की, "रेल्वेच्या कायमस्वरूपी मार्गावरील जुने स्लीपर्स, लोहयुक्त व अ-लोहयुक्त भंगार, तसेच वापरातून पूर्णपणे बाद झालेले जुने रेल्वे डबे आणि वॅगन्स यांसारख्या विविध प्रकारच्या टाकाऊ साहित्याची शास्त्रोक्त व पद्धतशीर विल्हेवाट लावून महसूल गोळा केला आहे. या मोहिमेमुळे रेल्वे परिसर स्वच्छ व सुंदर होण्यासही मोठी मदत होत आहे."
 


Topics mentioned in this article