जाहिरात

Mumbai Metro : आता गर्दीचा मनस्ताप संपणार! मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूरकरांसाठी काय आहे स्पेशल अपडेट?

Mumbai Metro Update : मुंबईकरांसाठी, विशेषतः पूर्व उपनगरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी  आहे

Mumbai Metro : आता गर्दीचा मनस्ताप संपणार! मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूरकरांसाठी काय आहे स्पेशल अपडेट?
Mumbai Metro Update : मानखुर्द, गोवंडी, चेंबूर आणि दक्षिण मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai Metro Update : मुंबईकरांसाठी, विशेषतः पूर्व उपनगरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी  आहे. मुंबई मेट्रो मार्गिका 2B च्या विस्ताराच्या दृष्टीने पुढील आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून बहुप्रतिक्षित चेंबूर मेट्रो स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मंडाळे ते डी. एन. नगर या 23.64 किलोमीटर लांबीच्या उन्नत पिवळ्या मार्गिकेवरील डायमंड गार्डन ते चेंबूर दरम्यानचा हा विस्तार लाखो दैनंदिन प्रवाशांचा प्रवास अतिशय वेगवान आणि सुखकर करणार आहे.

मुंबईकरांचा वेळ वाचणार

या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे चेंबूर स्थानकामुळे मेट्रो, मोनोरेल आणि हार्बर रेल्वे लाईनचे मल्टिमोडल इंटिग्रेशन शक्य होणार आहे. सार्वजनिक वाहतुकीची ही तिन्ही प्रमुख साधने एकमेकांशी थेट जोडली जात असल्याने प्रवाशांना एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बदलणे अत्यंत सोपे होईल. 

चेंबूर मेट्रो स्थानक हे व्ही. एन. पुरव मार्ग मोनोरेल स्थानकापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे. तसेच चेंबूर रेल्वे स्थानक आणि चेंबूर मोनोरेल स्थानकापासून ते केवळ 200 मीटर अंतरावर आहे.

या एकत्रिकरणामुळे मानखुर्द, गोवंडी, चेंबूर आणि दक्षिण मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. वाहतूक साखळी एकमेकांशी जोडल्या गेल्यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचेलच, पण त्याचसोबत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि वाहनांचा दबाव कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

( नक्की वाचा : NCMC Card: 1 ऑगस्टची मुदत हुकली तरी काळजी नको! एसटीच्या 'या' निर्णयामुळे लाखो प्रवाशांची अडचण दूर )

कसा आहे मार्ग?

एमएमआरडीए (MMRDA) कडून सुमारे 10,986 रुपये कोटी खर्चातून साकारल्या जात असलेल्या या संपूर्ण 23.643 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेवर एकूण 20 उन्नत स्थानके आहेत. यात डी. एन. नगर, बांद्रा, बीकेसी, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द आणि मंडाळे या अत्यंत महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे. 

या मार्गिकेचा पहिला टप्पा म्हणजेच डायमंड गार्डन ते मंडाळे दरम्यानचा 5.38 किलोमीटरचा भाग 8 एप्रिल 2026 रोजी प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला होता. तर डिसेंबर 2027 पर्यंत ही संपूर्ण मार्गिका पूर्ण क्षमतेने चालवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Vande Bharat : मराठवाड्यातील 'या' रेल्वे मार्गावर धावणार वंदे भारत? केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी )

सध्या कार्यरत असलेल्या मार्गावर सकाळी 6:00 ते रात्री 10:30 या वेळेत मेट्रो गाड्या धावत असून दर 9.5 मिनिटांच्या अंतराने मेट्रो सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. चेंबूर स्थानक सुरू झाल्यानंतर या परिसरातील दैनंदिन प्रवाशांच्या वेळेत आणि श्रमात मोठी बचत होणार आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com