Mumbai Metro 2B: मुंबईच्या पूर्व उपनगरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. शहराच्या मेट्रो नेटवर्कमध्ये पूर्व उपनगरांचा लवकरच समावेश होणार आहे. मेट्रो लाईन 2बी (Metro Line 2B) च्या पहिल्या टप्प्यातील मंडाले ते चेंबूरदरम्यानच्या 5 किमी लांबीच्या मार्गाला सुरू करण्यासाठी अंतिम सुरक्षा मंजुरी मिळाली आहे.
या बहुप्रतिक्षित मेट्रो मार्गाचे उद्घाटन 30 किंवा 31 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. हा टप्पा सुरू झाल्यास, पूर्व उपनगरांना मिळालेली ही पहिली मेट्रो सेवा ठरेल आणि या भागातील लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
यलो लाईन पूर्णत्वाच्या मार्गावर
यलो लाईन म्हणून ओळखली जाणारी मेट्रो लाईन 2, मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्याचे काम करते. MMRDA मार्फत विकसित केला जाणारा हा एकूण 23.6 किलोमीटरचा कॉरिडॉर दोन भागांमध्ये विभागलेला आहे. लाईन 2ए हा दहिसर (Dahisar) ते डीएन नगर मार्ग आधीच सुरु झाला आहे. तर लाईन 2बी हा डीएन नगर ते मानखुर्द येथील मंडालेपर्यंत असणार आहे.
मुंबईकरांना काय फायदा होणार?
मेट्रो 2B हा नवीन मार्ग सुरू झाल्यावर व्हीएन पुरव रोड आणि सायन-पनवेल महामार्गावरील प्रवासाचा वेळ 15 ते 20 मिनिटांनी कमी होईल. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होईल. पूर्व उपनगरातील रहिवाशांना, विशेषतः सर्वात पूर्वेकडील भागातील नागरिकांना प्रथमच मेट्रोची सुविधा उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होईल.
(नक्की वाचा- Vande Bharat Train: कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर! 'वंदे भारत'च्या फेऱ्या वाढल्या, पाहा नवीन वेळापत्रक)
मेट्रो लाईन 2बी खालील महत्त्वाच्या लाईन्सशी जोडली जाईल
- हार्बर लाईन : मानखुर्द येथे हार्बर रेल्वे लाईनशी इंटरचेंजची सोय उपलब्ध असेल.
- पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे : शहराच्या महत्त्वाच्या रेल्वे मार्गांशी जोडणी.
- महामार्ग : वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे शी थेट कनेक्टिव्हिटी.
- मेट्रो लाईन्स: मेट्रो लाईन 1 (घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो लाईन 2ए (दहिसर-डीएन नगर), मेट्रो लाईन 4 (वडाळा-कासारवडवली), मेट्रो लाईन 3 (आरे-कुलाबा).
- मोनोरेल : मोनोरेल नेटवर्कशी देखील जोडणी उपलब्ध असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world