जाहिरात

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी Good News! आणखी 2 मेट्रो मार्ग सुरु होणार, तारीख ठरली, 'या' प्रवाशांना होणार फायदा

कार्यक्रमात बीकेसी (BKC) येथे पॉड टॅक्सी प्रणालीचे भूमिपूजन आणि ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी टनेल बोरिंग मशीनचे (TBMS) उद्घाटन होण्याचीही शक्यता आहे.

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी Good News! आणखी 2 मेट्रो मार्ग सुरु होणार, तारीख ठरली, 'या' प्रवाशांना होणार फायदा

Mumbai Metro Line 9 Dahisar to Kashigaon:  मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुखकर होण्यासाठी आणखी दोन नव्या मेर्टो मार्गिकेचा शुभारंभ होणार आहे. राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर काशीगाव आणि दहिसर दरम्यानच्या मेट्रो लाईन ९  आणि  डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो ३ उद्घाटन ३ एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात बीकेसी (BKC) येथे पॉड टॅक्सी प्रणालीचे भूमिपूजन आणि ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी टनेल बोरिंग मशीनचे (TBMS) उद्घाटन होण्याचीही शक्यता आहे.

Kalyan News: कल्याणच्या आठवडी बाजारात राडा, KDMC अधिकारी-विक्रेत्यांमध्ये बाचाबाची, व्हिडीओ होतोय व्हायरल 

मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो लाईन! 

समोर आलेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर आणि मुंबईला जोडणाऱ्या मेट्रो मार्ग ९ (दहिसर ते काशिगाव) या ४.५ किमी लांबीच्या उन्नत मार्गाचे लोकार्पण येत्या ३ एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा असली तरी, एमएमआरडीएने (MMRDA) या कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. या सोहळ्यात केवळ मेट्रोचे उद्घाटनच नव्हे, तर बीकेसीमधील 'पॉड टॅक्सी' प्रकल्पाचे भूमिपूजन आणि ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्पाच्या 'टीबीएम' (टनेल बोरिंग मशीन) कार्यान्वित करण्याचा शुभारंभ देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणाला होणार फायदा? 

​मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) चा विस्तार असलेल्या या नवीन मार्गामुळे मिरा रोडवरून थेट अंधेरी पूर्व (गुंदवली) पर्यंत विनाखंड प्रवास करणे शक्य होणार आहे. प्रवाशांना दहिसर येथे गाडी बदलण्याची गरज भासणार नाही. तसेच, पश्चिम उपनगरात जाणाऱ्या प्रवाशांना दहिसर येथे मेट्रो २-ए मध्ये बदलून अंधेरी पश्चिम गाठता येईल. या टप्प्यात दहिसर (पूर्व), पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशिगाव या चार स्थानकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ज्या 'गोल्डन नेस्ट' उड्डाणपुलाच्या अरुंद मार्गिकेवरून वाद निर्माण झाला होता, तो पूलही प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे.

नक्की वाचा >>  Dadar Station Video : दगडफेकीच्या घटनेनंतर आज पुन्हा दादर स्टेशन परिसरात प्रवाशांमध्ये घबराट, मोठा अनर्थ टळला

Listen to the latest songs, only on JioSaavn.com