जाहिरात
This Article is From Jul 05, 2024

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, 10 नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार; 2 आमदारांचं टेन्शन वाढलं

Political News : ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. एका नगरसेवकांना मागील विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, 10 नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार; 2 आमदारांचं टेन्शन वाढलं

विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे माजी महापौर राजू शिंदे यांच्यासह 10 पेक्षा अधिक नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 7 जुलै रोजी संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगरमध्ये होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा प्रवेश सोहळा होणार आहे. 

आम्ही फक्त शिंदे गट आणि भाजपसाठीच काम करायचं का? असा प्रश्न ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या भाजप नेत्यांनी विचारला आहे. त्यामुळे या प्रवेशानंतर संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका मंत्री अतुल सावे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना बसण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. एका नगरसेवकांना मागील विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. 

कोण कोण जाणार ठाकरे गटात

6 ते 8 माजी  नगरसेवक
1 जिल्हा परिषद सदस्य
2 पंचायत संमती 
1 तालूका अध्यक्ष
1 युवा मोर्चा अध्यक्ष 
5 मंडळ अध्यक्ष

(नक्की वाचा - "नागरिक, विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची सोय करा"; हिंगोलीच्या कलागाव ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे अजब मागणी)

भाजपला मोठा धक्का

भाजपच्या 6 पेक्षा अधिक नगरसेवकांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवसात विधानसभा निवडणुका पार पडत आहे. अशात हा पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का समजला जातोय. विशेष म्हणजे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते पुन्हा पश्चिम विधानसभेतून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर राजू शिंदेंचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. 

(नक्की वाचा- लाडकी बहीणीची फरफट, अर्ज भरताना ना-ना अडचणी)

शिंदे गटावर गंभीर आरोप 

लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजपने मोठी मेहनत केली. त्यामुळे संदिपान भुमरे यांच्या विजयात भाजपचा मोठा वाटा आहे. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारले जात नाही. एवढेच काय तर विजयानंतर आभार देखील मानण्यात आले नसल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही शिंदे गटाचे किती दिवस काम करायचं? असं म्हणत भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचा देखील भाजपचे नगरसेवक सांगतायात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: