
औरंगजेब कबर वादाचा फटका पर्यटनाला बसत असल्याचं समोर आलं आहे. खुलताबाद, वेरूळ येथील धार्मिक आणि पर्यटन स्थळावरील वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे. त्यामुळे पर्यटकांनी देखील येथे पाठ फिरवली आहे. मागील 15 दिवसांपासून जवळपास 100 हॉटेल व्यावसायिकांचे बुकिंग रद्द झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
औरंगजेब कबर वादाचा हॉटेल व्यावसायिकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. गेल्या 15 दिवसापासून झालेल्या नोंदणी रद्द होत असल्याने व्यावसायिक चिंतातूर झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटकांची संख्या 50 टक्क्यांनी घटली आहे. पुरातत्त्व विभागाच्या फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
(नक्की वाचा- पुणे-नाशिक अंतर 2 तासांनी कमी होणार? सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार)
पर्यटकांची संख्या घटल्याची आकडेवारी
फेब्रुवारी महिना: 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2025
बीबी का मकबरा
भारतीय पर्यटक - 37,340
विदेशी पर्यटक- 667
दौलताबाद किल्ला
भारतीय पर्यटक - 17,237
विदेशी पर्यटक- 280
वेरूळ लेणी
भारतीय पर्यटक- 64,663
विदेशी पर्यटक-1560
अजिंठा लेणी
भारतीय पर्यटक- 17667
विदेशी पर्यटक- 1265
(नक्की वाचा- Crime News : प्रशांत कोरटकर दुबईत की तपास भरकटवण्याचा प्रयत्न? जुन्या इन्स्टा पोस्टमुळे संशय बळावला)
मार्च महिना: 1 मार्च 15 मार्च 2025
बीबी का मकबरा
भारतीय- 7566
विदेशी पर्यटक- 167
दौलताबाद किल्ला
भारतीय पर्यटक - 17237
विदेशी पर्यटक- 280
वेरूळ लेणी
भारतीय पर्यटक - 5282
विदेशी पर्यटक- 101
अजिंठा लेणी
भारतीय पर्यटक- 6335
विदेशी पर्यटक- 479
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world