जाहिरात

Crime News: कसे वाटले VIDEO? मैत्रिणीच्या बोलण्याचा संशय... मोबाईल पाहताच धक्का बसला; तरुणीसोबत काय घडलं?

प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर स्वराज धालगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News: कसे वाटले VIDEO? मैत्रिणीच्या बोलण्याचा संशय... मोबाईल पाहताच धक्का बसला; तरुणीसोबत काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar Crime: हॉस्टेलमध्ये एकत्र राहणाऱ्या एका तरुणीने आपल्या रुममेट मैत्रिणीचे खासगी व्हिडिओ काढून बॉयफ्रेंडला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागातील एका नामांकित कॉलेजच्या वसतीगृहात हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मैत्रिणीनेच केला विश्वासघात...

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको भागातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोबत राहणाऱ्या मैत्रिणीनेच एका तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ चोरून चित्रित करून ते आपल्या प्रियकराला पाठवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर स्वराज धालगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mouni Roy: वृद्धाचे अश्लील चाळे, कमरेवर हात, गुलाब फेकले.. बॉलिवूड अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, पोस्ट व्हायरल

पीडित तरुणी आणि आरोपी तरुणी या दोघीही अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून गेल्या तीन वर्षांपासून एकाच वसतिगृहात राहत होत्या. १९ जानेवारी रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आरोपी तरुणी आपल्या प्रियकराशी फोनवर संशयास्पद संभाषण करत असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. फोनवर बोलताना “फोटो आणि व्हिडिओ कसे वाटले? हॉट आहेत का?” असे शब्द वापरत असल्याने तिला संशय आला.

खासगी व्हिडिओ बॉयफ्रेंडला पाठवले

त्यानंतर पीडितेने आरोपी तरुणीला रंगेहाथ पकडत तिचा मोबाइल ताब्यात घेतला. पासवर्ड विचारून मोबाइल तपासला असता कपडे बदलतानाचे आपलेच व्हिडिओ आरोपी तरुणीने चोरून काढून ते तिच्या प्रियकराला पाठवल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या पीडित तरुणीने तात्काळ सिडको पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर यांच्याविरोधात आयटी अ‍ॅक्टसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Malad Crime: मुंबईत चाललंय काय? लोकलमध्ये प्राध्यापकाला संपवलं; ट्रेनमधून उतरताना वाद अन्...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com