जाहिरात

Crime News: एक नंबर चुकला अन्... मित्राला भेटायला हॉटेलमध्ये गेलेल्या 30 वर्षीय महिलेसोबत भयंकर घडलं

Chhatrapati Sambhajinagar Crime : पीडित महिला एका खासगी रुग्णालयात काम करते. तिला पैशांची अत्यंत गरज असल्याने तिने आपल्या एका ओळखीच्या मित्राकडे मदत मागितली होती. त्या मित्राने तिला पैसे देण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावले होते.

Crime News: एक नंबर चुकला अन्... मित्राला भेटायला हॉटेलमध्ये गेलेल्या 30 वर्षीय महिलेसोबत भयंकर घडलं

छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये भयंकर घटना घडली आहे. एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या 30 वर्षीय विवाहितेवर तिघांनी मिळून सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ रूम नंबरमध्ये गल्लत झाल्याने ही महिला नराधमांच्या तावडीत सापडली. या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या 3 तासांत तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नेमकी घटना काय?

पीडित महिला एका खासगी रुग्णालयात काम करते. तिला पैशांची अत्यंत गरज असल्याने तिने आपल्या एका ओळखीच्या मित्राकडे मदत मागितली होती. त्या मित्राने तिला पैसे देण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. हा मित्र हॉटेलमधील रुम नंबर 105 मध्ये थांबला होता.

महिला तिथे पोहोचल्यानंतर तिने मित्रासोबत मद्यप्राशन केले आणि जेवणही केले. त्यानंतर ती फोनवर बोलण्यासाठी रूमच्या बाहेर आली. काही वेळाने पुन्हा रूममध्ये जाण्यासाठी निघालेली महिला गोंधळली आणि तिने 105 नंबर ऐवजी चुकून 205 नंबरचे दार ठोठावले.

(नक्की वाचा-  Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)

मद्यधुंद नराधमांचे क्रूर कृत्य

महिलेने दार वाजवताच रूम नंबर 205 मध्ये मद्यपान करत बसलेल्या तिघांनी दार उघडले. समोर महिलेला पाहून या तिघांच्या डोक्यात नराधम जागा झाला. त्यांनी तातडीने महिलेला खोलीच्या आत ओढले आणि दार लावून घेतले. ओरडल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी तिला बळजबरीने बिअर पाजली. त्यानंतर पहाटेपर्यंत तिघांनीही तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.

पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास संधी मिळताच पीडितेने या नराधमांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. तिने आरडाओरड करत हॉटेलच्या बाहेर धाव घेतली आणि थेट वेदांतनगर पोलीस स्टेशन गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला.

(नक्की वाचा-  NHAI QR Code: महामार्गावर QR कोड; प्रवाशाने स्कॅन केल्यावर मिळाली भन्नाट माहिती; तुम्हालाही अभिमान वाटेल)

पोलिसांनी तातडीने केली कारवाई

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हॉटेल गाठले. CCTV फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अवघ्या 3 तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. घनश्याम भाऊलाल राठोड, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण, किरण लक्ष्मण राठोड अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींवर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com