पर्यटकांचा हिरमोड! आणखी एका पर्यटनस्थळावर 15 सप्टेंबरपर्यंत जाण्यास बंदी

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील गौताळा अभयारण्यात देखील पर्यटकांना 15 सप्टेंबरपर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे भर पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

लोणावळ्यातील बुशी डॅम परिसरात पाच जण वाहून गेल्याच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक पर्यटनस्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील गौताळा अभयारण्यात देखील पर्यटकांना 15 सप्टेंबरपर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे.  

जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे भर पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. पावसाळा सुरु झाला की पर्यटकांची गर्दी गौताळा अभयारण्याकडे वळताना दिसते. मात्र पावसाळ्यात पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे खबरदारी म्हणून तीन महिने पर्यटकांना याठिकाणी प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. 

(नक्की वाचा- ठाणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर बंदी; दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश)

gautala sanctuary

सप्तकुंड धबधब्याजवळ सेल्फी, रील्सवर बंदी

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात असलेल्या सप्तकुंड  धबधब्याजवळ धोकादायक रील्स, सेल्फी अथवा फोटोसेशन करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेला सप्तकुंड धबधबा मोठी गर्दी पाहायला मिळते.

(नक्की वाचा- 'लोणावळा खंडाळा बंद करा, तुम्ही आमच्या पोटावर पाय आणला')

निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. परंतु याचवेळी भावनेच्या भरात उत्साही पर्यटक नको ते धाडस करतात आणि संकटाला आमंत्रण देतात. यापूर्वीही अशा धोकादायक घटना याठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी सप्तकुंड धबधब्याजवळ फोटोसेशन आणि सेल्फी घेण्यासाठी बंदी घातली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article