नीलकमल बोट अपघात: फडणवीस, शिंदेंनी दिली महत्वाची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीलकमल बोटीचा झालेल्या अपघाताची माहिती विधानसभेत दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

गेट वे ऑफ इंडीयावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीला नेव्हीच्या स्पिड बोटने धडक दिली. या बोटीत 80 प्रवाशी होते. त्यापैकी 73 जणांना वाचविण्यात यश आलं आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना सुरक्षित बाहेर काढा असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तर घटना घडल्यानंतर शेकापचे नेते जयंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीलकमल बोटीचा झालेल्या अपघाताची माहिती विधानसभेत दिली. एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे असे फडणवीस म्हणावे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. दुपारी सव्वा तीन वाजता ही बोट एलिफंटाकडे  निघाली होती. 

ट्रेंडिंग बातमी - समुद्रात वेगाने फिरली अन् नेव्हीची स्पीड बोट थेट प्रवासी नौकेला धडकली, अपघाताचा थरारक Video समोर

दरम्यान  एलिफंटा परिसरात प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली.  त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले आहे. त्यानुसार बचावकार्य वेगात सुरू आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Live Update : बोट दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, 80 पैकी 66 जणांचा वाचवण्यात यश

यावेळी शेकापनेते जयंत पाटील यांनी ही अपघात स्थळाला भेट दिली. तिथे जावून त्यांना पाहाणी ही केली. पोर्ट डिपार्टमेंटला वेगळी यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. हा अपघात दुर्दैवी आहे असंही ते म्हणाले. नेव्हीची बोट प्रवाशी बोटीला धडकल्याने हा अपघात झाल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व प्रवाशी सुरक्षित बाहेर यायला पाहीजे यासाठी आपली प्राथमिकता असल्याचेही त्यांनी सांगितले. हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटन हब आहे. त्यानुसार इथं सोयी उपलब्ध असल्या पाहिजेत असंही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - नेव्हीची नौका एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीला धडकली, 30 पैकी 21 जणांना वाचवण्यात यश

नीलकमल बोटीचे मालक राजेंद्र पडते यांनी अपघाताचीही माहिती दिली. या बोटीवर 80 प्रवाशी होती. शिवाय सर्वांनी लाईफ जॅकेट घातले होते. सर्व सुरक्षेच्या गोष्टी दिल्या होत्या. हा अपघात नेव्हीच्या  स्पिड बोटमुळे झाल्याचे ते म्हणाले. आधी या बोटीने  एक राऊंड मारला. त्यानंतर ती वेगाने परत आली. त्यावेळी प्रवाशी बोटीला जोरदार धडक दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान याबाबतचा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्याला मुख्यमंत्र्यांना उत्तर दिले.