Maharashtra Assembly Winter Session: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. अधिवेशनामध्ये बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण गाजत असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. विधानसभा अध्यक्ष आज या संबंधी चर्चेसाठी वेळ देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे संसदेमध्ये एक देश एक निवडणूक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. पुढे हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं आहे.
गेट वे इंडियावरुन एलिंफटाच्या दिशेने जाणाऱ्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं मुंबईला धक्का बसला आहे. आज रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताची माहिती दिली. नौदलाच्या स्पीड बोटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकल्याची माहिती समोर आली आहे.
Live Update : वसईत हिट अँड रनच्या घटनेने खळबळ, भरधाव बाईकच्या धडकेत 14 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू
वसई पश्चिमेच्या पापडी येथील जीजी कॉलेज समोरी एका भरधाव बाईकच्या धडकेत 14 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात साइस्ता इमरान शहा हिचा जागीच मृत्यू झाला आहे. साइस्ताला ज्या बाईकने धडक दिली, त्या बाईकला नंबर प्लेट नसल्याचं समोर आलं आहे. अपघातानंतर बाईक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून तो अल्पवयीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विशेष म्हणजे या अपघातानंतर घटनास्थळी बघा यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र साइस्ताला जर तत्काळ उपचार मिळाले असते तर कदाचित ती वाचली असती असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.
Live Update : मेल एक्स्प्रेसच्या इंजिन बिघाडामुळे आसनगावहून कल्याणच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक ठप्प
आसनगाव टिटवाला रेल्वे स्थानकादरम्यान मेल एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड
हरिद्वार ते लोकमान्य टिळक टर्मिनसकडे येणाऱ्या मेल एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड
आसनगावहून कल्याणच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक ठप्प
रेल्वेकडून इंजिन दुरुस्तीचे काम सुरू
Live Update : जामनेर तालुक्यातील भराडी - आमठाणा रोडवर स्कूल बसने घेतला पेट
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या भराडी - आमठाणा रोडवर धावत्या स्कूल बसने पेट घेतला असून बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने विद्यार्थ्यांना वेळीच खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून अवघ्या काही वेळात बसला लागल्या आगीने रौद्ररूप घेतल्याने संपूर्ण स्कूल बस जळून भस्मसात झाली आहे. भराडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाची ही बस असल्याची माहिती समोर आली असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Live Update :Live Update : गेट-वे बोट अपघात नेमका कसा झाला? मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितली माहिती
Live Update : ‘जीएसटी’ परिषदेत मंत्री आदिती तटकरे करणार राज्याचे प्रतिनिधित्व
राजस्थानमधील जैसलमेर येथे होणाऱ्या डिसेंबर 2024 च्या जीएसटी परिषदेमध्ये मंत्री आदिती तटकरे या राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री कु.तटकरे यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांकडून जीएसटीबाबत सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस राज्य कर आयुक्त आशिष शर्मा, विक्रीकर सह आयुक्त किरण शिंदे, विक्रीकर उपायुक्त नंदकुमार दिघे आदी उपस्थित होते.
Live Update : बोट अपघातात 80 पैकी 73 जणांना वाचविण्यात यश
बोट अपघातात 80 पैकी 73 जणांना वाचविण्यात यश
Live Update : नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलीस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना - मुख्यमंत्री
एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
Live Update : बोट दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू..
बोट दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू..
Live Update : प्रवासी बोटीत 56 प्रवासी होती, त्यापैकी 21 जणांना वाचवण्यात यश
अपघात झाला त्यावेळी प्रवासी बोटीत 56 प्रवासी होते, यातील 21 जणांना वाचवण्यात यश, बाकीच्यांचा शोध सुरू
Live Update : काँग्रेसने आपल्याच लोकांना भारतरत्न दिला, काँग्रेस आरक्षणविरोधी आणि संविधानविरोधी पक्ष - अमित शाह
काँग्रेसने आपल्याच लोकांना भारतरत्न दिला, काँग्रेस आरक्षणविरोधी आणि संविधानविरोधी पक्ष - अमित शाह
Live Update : राहुल गांधीची आज सायंकाळी 6.30 वाजता पत्रकार परिषद
राहुल गांधीची आज सायंकाळी 6.30 वाजता पत्रकार परिषद
Live Update : गेटवे बोट अपघात प्रकरणात 30 पैकी 25 प्रवाशांना वाचवण्याच यश
गेटवे बोट अपघात प्रकरणात 30 पैकी 25 प्रवाशांना वाचवण्याच यश आलं आहे..
Live Update : गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली, 30 प्रवासी असल्याची माहिती
गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली, 30 प्रवासी असल्याची माहिती
Live Update : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर भलामोठा खड्डा
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर भलामोठा खड्डा
पुण्यातील या एकमेव रस्त्यावर 49 वर्षात एकही खड्डा पडला नव्हता
आता या रस्त्यावर 10 फूट खड्डा पडला आहे
Live Update : गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ
गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सदावर्ते जात असताना मराठा कार्यकर्त्यांनी बुक्का फेकत अडवण्याचा केला प्रयत्न
सतत मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य गुण रत्न सदावर्ते करत असल्याचा केला आरोप
तुळजाभवानीचे दर्शन व एसटी कर्मचारी संघटनेच्या मीटिंगसाठी सदावर्ते आले आहे तुळजापुरात
सतत मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य गुण रत्न सदावर्ते करत असल्याचा केला आरोप
Live Update : मंत्री जरी नसलो तरी रक्ताच्या शेवटचा थेंबापर्यंत मी मागासवर्गीयांसोबत - छगन भुजबळ
मंत्री जरी नसलो तरी रक्ताच्या शेवटचा थेंबापर्यंत मी मागासवर्गीयांसोबत. कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही - छगन भुजबळ
Live Update : मी लगेच काही निर्णय घेणार नाही - छगन भुजबळ
मी लगेच काही निर्णय घेणार नाही. उद्या परवा मुंबईत जाईल. अनेक समाजाचे, इतर राज्यातील नेत्यांसोबत चर्चा करावी लागेल - छगन भुजबळ
Live Update : मराठा आरक्षणाला कधीही विरोध केला नाही - छगन भुजबळ
अनेकजण कोत्या मनोवृत्तीचे आहेत. जे आम्हाला संपवायला निघालेत, त्यांना आमचा विरोध आहे. ज्यांना हे समतेचे चक्र उलटं फिरवायचे आहे त्यांना आम्ही विरोध करतो. आरक्षणाने सगळे प्रश्न सुटत नाहीत. मागासवर्गीय मंडळी हळूहळू पुढे येतील, त्यांना आरक्षण द्या. मराठा आरक्षणाला कधीही विरोध केला नाही. तीन वेळा हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर छगन भुजबळाने पहिला हात वरती केला. मला मराठा समाजाच्या अनेकांनी सांगितले हा प्रश्न सोडवायला पाहिजे. हो सोडवायला पाहिजे पण तो एकमेकांच्या हक्कांवर आक्रमण करुन, कुरघोड्या करुन नको. आपण मराठाविरेधी नाही हे लक्षात घ्या, असंही ते म्हणाले.
Live Update : शंभूराज देसाईंना दिलेली नेमप्लेट ठरली खरी, कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नेमप्लेट चर्चेचा विषय
शंभूराज देसाई यांनी डाकेवाडी (काळगांव) येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट दिली होती. यावेळी डाकेवाडीतील ग्रामस्थांकडून त्यांना नेमप्लेट भेट म्हणून देण्यात आली होती. त्यावर लिहिलं होतं शंभूराज शिवाजीराव देसाई - मंत्री महाराष्ट्र राज्य सन 2024 ते 2029.
आता ना.देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ही नेमप्लेट चर्चेचा विषय ठरली आहे. शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आणि डाकेवाडीकर ग्रामस्थांनी प्रचार काळात दिलेली नेमप्लेट खरी ठरली. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर सत्कार स्वीकारण्यासाठी नामदारसाहेबांनी वेळ द्यावी असे आवाहन समस्त डाकेवाडी ग्रामस्थ करत आहेत.
Live Update : मीरा भाईंदर महानगपालिकेच्या गेटला ठोकलं टाळं
मीरा भाईंदर महानगपालिकेच्या गेटला ठोकलं टाळ
नागरिक, पालिका कर्मचारी, लोकप्रतिनिधी गेटच्या बाहेर उभे
प्रहार दिव्यांग संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महानगपालिकेच्या गेटला ठोकलं टाळ
दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने दिव्यांग संतप्त
दिव्यांगांच्या स्टॉलवर पालिकेकडून कारवाई होत असल्याचा निषेधार्थ आंदोलन
Live Update : एखादी घटना अशी घडते की शांत असलेली माणसं पेटून उठतात. - छगन भुजबळ
एखादी घटना अशी घडते की शांत असलेली माणसं पेटून उठतात. - छगन भुजबळ
Live Update : समर्थकांना प्रश्न विचारला जात आहे की, साहेबांना का डावललं, छगन भुजबळांनी सभेत व्यक्त केली खंत
महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीत समाज खिन्न झाला आहे. माझ्या मतदारसंघातील माझ्या विरुद्ध काम केलेले मराठा समाजाली लोक माझ्या समर्थकांना सवाल विचारत आहेत. या धक्क्यात आपण सर्वजण आहोत. अनेक संदेश येत आहेत. साहेबांना का डावललं?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Live Update : नाशिक मेळाव्यातून छगन भुजबळ लाईव्ह...
नाशिक मेळाव्यातून छगन भुजबळ लाईव्ह...
Delhi: मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींची PM मोदींसोबत बैठक
दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे , राहुल गांधी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक सुरू आहे. राष्ट्रीय मानवी अधिकार आयोग अध्यक्ष नियुक्तीबाबत ही बैठक होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Beed News: वाल्मीक कराड यांना तत्काळ अटक करा,धनंजय मुंडे यांची मागणी
बीड येथील मस्साजोग येथील सरपंचाचा निर्घृण खून करण्यात आला.खून करणारा गुन्हेगार हा नुकताच मंत्रीपदाची शपथ घेतलेले धनंजय मुंडे यांच्या विश्वासू आहे.यामुळे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा,हिवाळी अधिवेशन संपण्या अगोदर वाल्मीक कराड यांना तत्काळ अटक करा, अन्यथा सकल मराठा समाज रस्त्यावरच आंदोलन करेल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, चौथा आरोपी अटकेत
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटे पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी मधील आरोपी आहे. त्याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात येत असून आता आरोपींची संख्या चार वर पोहोचली आहे.
Winter Session Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात मविआच्या आमदारांचे वॉक आऊट
संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उदगार काढल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात उभे राहिले असता त्यांना बोलू न दिल्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी वॉक आऊट केले.
सभागृहात आम्ही गृहमंत्र्यांच्या उदगारावर निषेध व्यक्त केला असता ते रेकॉर्ड वर यावे यासाठी सभापती यांनी वेगळी भूमिका घेतली. गृहमंत्री यांचे उदगार हे संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान करणारे आहे. महायुती त्यांचा आदर करत नाही का असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा मुद्दा राज्यातील सभागृहात उपस्थित केला जातो मग गृहमंत्री यांच्या उदगाराचा मुद्दा का उपस्थित केला जात नाही असा सवाल करत दानवे यांनी निषेध व्यक्त केला.
Chhagan Bhujbal News: संघर्ष मेळाव्याला सुरुवात; छगन भुजबळ काय निर्णय घेणार?
नाशिकच्या जय शंकर लॉन्सवर ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या संघर्ष मेळाव्याला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील समता परिषद, ओबीसी समाजाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित असून छगन भुजबळ काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी प्रत्येकाचे मत जाणून घेतले जात आहे. समर्थक आपल्या भाषणात तीव्र प्रतिक्रिया देत असून समर्थकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर छगन भुजबळ आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
Sharad Pawar Meet PM Narendra Modi: दिल्लीत मोठी घडामोड! शरद पवार- PM मोदींची भेट
एकीकडे राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. दिल्लीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या संसदेतील कार्यालयामध्ये ही भेट झाली. मराठी साहित्य संमेनलाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठीही ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आर अश्विनकडून निवृत्तीची घोषणा
रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
भारतीय क्रिकेटपटू म्हणून शेवटचा दिवस - आर अश्विन
Parliament Session Live: अमित शहांच्या वक्तव्यावरुन विरोधक आक्रमक; राज्यसभा स्थगित
संसदेच्या कामकाकाजात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका विधानावरुन नवा वाद उभा राहिला आहे. आजकाल जप चालला आहे. आंबेडकर आंबेडकर आंबेडकर… एवढंच नाव देवाचं घेतलं असतं तर स्वर्गप्राप्ती झाली असती, असं अमित शहा म्हणाले होते. यावरुनच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले तसेच अमित शहांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. त्यामुळे राज्यसभा दुपारी २ पर्यंत स्थगित करण्यात आली.
बदलापूर अत्याचार प्रकरण: पोलीस निरीक्षकांचे निलंबन
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब आणि तपासातील विलंबाबद्दल ठपका ठेवत खातेनिहाय चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ऍड. हितेन वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयाला दिली.
Delhi News: विरोधी खासदारांच्या संसदेच्या आवारात आंदोलन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी उमटल्याचे पाहायला मिळाले. अमित शहा यांनी केलेल्या विधानाचा निषेध विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या आवारात केला. काँग्रेसच्या प्रियांका गांधी, वर्षा गायकवाड , रजनी पाटील, प्रशांत पडोळे निदर्शनात सहभागी झाले होते.
Chhagan Bhujbal: येवल्यातून शेकडो भुजबळ समर्थक नाशिकला रवाना
मंत्री मंडळात डावलल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळ राज्यातील समर्थक व समता परिषद कार्यकर्त्यांनी नाशिकच्या जेजुरकर मळा येथे आयोजित. मेळाव्याला छगन भुजबळ यांचा मतदार संघ असलेल्या येवला - लासलगाव मतदार संघातून शेकडो कार्यकर्ते नाशिकला रवाना झाले.येवला येथील भुजबळ संपर्क कार्यालयाजवळ भुजबळ समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमत जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्ते नाशिककडे रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पवार, पटेल, तटकरे असा प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झाला आहे.छगन भुजबळ यांना पक्षात वारंवार अपमानाची वागणूक दिली जात आहे याची पक्षाला जाणीव व्हावी यासाठी भुजबळ समर्थकांच्या राज्यव्यापी मेळाव्यात जात असल्याची भावना व्यक्त केली आहे.
Kolhapur News: पाटबंधारे विभागाच्या शासकीय रहिवासी इमारतीच्या गेटची तोडफोड
पाटबंधारे विभागाच्या शासकीय रहिवासी इमारतीच्या गेटची तोडफोड
शासकीय कर्मचारीच तोडफोड करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
लोखंडी गजाने इमारतीच्या प्रवेशद्वाराची केली तोडफोड
कर्मचाऱ्यांच्या दबंगगिरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं दुर्लक्ष
संबंधित वारणा इमारतीमधील महिला दहशतीत
महिलांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन मात्र कोणतीच कारवाई नाही
MLA Parinay Fuke: आमदारांच्या सोशल मीडियावर निर्बंध कडक करा: आमदार परिणय फुके
सर्वत्र सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. सामान्य माणसाच्या सोशल मीडिया वापरावर फारशी बंधने नसल्यामुळे याचा वापर अनिर्बंध प्रमाणात सुरू आहे. मात्र, शासकीय अधिकारी व कर्मचारी सामान्य नागरिकांप्रमाणे सोशल मीडिया म्हणजे इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचाट यांचा फार मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात निर्बंध कडक करावेत, अशी मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे.
Amravati News: शिक्षणाचा खेळखंडोबा! मराठी व उर्दू माध्यमांची 777 शिक्षकांची पदे रिक्त.
अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात ८८८ पदाचा बॅकलॉग...
शिक्षणाचा खेळखंडोबा, मराठी व उर्दू माध्यमांची 777 शिक्षकांची पदे रिक्त...
मागील कित्येक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांपासून तर शिक्षकांचे अनेक पदर रिक्त...
प्राथमिक शाळेत मराठी माध्यमांच्या शिक्षकांची 680, उर्दू माध्यमाची 97, केंद्रप्रमुखांची 81, विस्तार अधिकाऱ्यांची 18, गटशिक्षणाधिकाऱ्यांची 10, उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी एक अशी तब्बल 888 विविध पदे रिक्त...
रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला,
विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतेय गंभीर परिणाम...
Sunil tatkare: छगन भुजबळ यांची नाराजी दूर करणार: सुनील तटकरे
राष्ट्रवादीमध्ये सुरु झालेले नाराजीनाट्य आणि छगन भुजबळ यांच्या आक्रमक भूमिकेवरुन सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खाते वाटपावरुन पक्षामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. योग्य वेळ आल्यावर छगन भुजबळ यांची भेट घेणार असून त्यांची नाराजी दूर केली जाईल, असं ते म्हणालेत.
Ajit Pawar: नॉट रिचेबल अजित पवार नागपूरमध्ये दाखल, आज कामकाजात सहभागी होणार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून नॉटरिचेबल होते. हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून दोन दिवस अजित पवार गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. आज अजित पवार विधिमंडळ कामकाजात सहभागी होण्यासाठी विधान भवन परिसरात दाखल झाले आहेत.
Ram Shinde: राम शिंदे आज विधान परिषद सभापतीपदासाठी अर्ज भरणार
भारतीय जनता पक्षाचे नेते, विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे हे आज विधान परिषद सभापती निवडणुकीबाबत अर्ज दाखल करणार आहेत. कालच राम शिंदे यांना उमेदवारी देण्याची घोषणा झाली होती. आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधान भवनात दाखल झाले आहेत.
Mumbai Pune Highway Accident: वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 68 जवळ मुबई वरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेन वर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास वडगाव मावळ हद्दीत हा अपघात झाल्याची माहिती मिळतीय, अपघात मृत पावलेला बिबट्या हा पूर्ण वाढ झालेल्या असून, रात्रीच्या सुमारास रस्ता ओलांडताना त्याला वाहनाने धडक दिलीय, दरम्यान या मृत पावलेला बिबट्याचे शव मावळ विभागाने आपल्या ताब्यात घेतले आहे.
Sangli Bribe: 50 हजाराची लाच घेताना महिला पोलीस जाळ्यात
सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत महिला हवलदार मनीषा कोनोळीकर उर्फ बडेकर हिला 50 हजार रुपये लाज घेताना लाचलोचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही लाच मागितली होती. रात्रीच्या सुमारास सांगलवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.
पोलिसात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी बडेकरी हिने केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी करून पथकाने काल रात्री सांगलवाडी येथे सापळा रचला तिथे तिला लाज घेताना रंग हात पकडले. संशयित विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhagan Bhujbal News: अन्याय झाला, राष्ट्रवादी सोडावी: छगन भुजबळ समर्थक आक्रमक
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरु झालंं आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करत थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे. आज नाशिकच्या जय शंकर लॉन्सवर राज्यभरातील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत छगन भुजबळ संवाद साधणार आहेत. दरम्यान ज्या जय शंकर लॉन्सवर हा मेळावा पार पडणार आहे त्या मेळाव्याच्या मंचावर 'बुलंद आवाज बहुजनांचा' असा उल्लेख असलेले होर्डिग बघायला मिळत असून राज्यभरातून समता परिषदेचे पदाधिकारी, ओबीसी समाजाचे नेते दाखल होतायत. विशेष म्हणजे साहेबांवर अन्याय झाला असून त्यांनी आता निर्णय घ्यावा आणि राष्ट्रवादी सोडावी असं भुजबळ समर्थक बोलून दाखवत आहेत.
MSRTC News: एसटी महामंडळाच्या 14 टक्के भाडेवाढ प्रस्तावाचा चेंडू आता सरकारच्या कोर्टात
एसटी महामंडळाच्या 14 टक्के भाडेवाढ प्रस्तावाचा चेंडू आता सरकारच्या कोर्टात
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सोमवारी राज्य सरकारला 14.4% भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या राज्य मंत्रिमंडळात लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे तीन वर्षांच्या अंतरानंतर एसटी महामंडळाकडून भाडेवाढ केली जात आहे.
दरवर्षी दिवाळीच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सुमारे 10% भाडेवाढ केली जाते. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे यंदा भाडेवाढ करण्यात आली नाही.
त्यानंतर आता 14.4 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे
Shashikant Shinde Meet Ajit Pawar: शरद पवारांचे विश्वासू शिलेदार अजित पवारांच्या भेटीला
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आज अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजय गड या शासकीय निवास स्थानी गेले आहेत. दोन दिवसापासून अजित दादा नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ते निवास स्थानी असून विधान भवन परीसरात आलेले नाहीत. त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा भेट नाकारली होती. त्यांच्या गळ्याला संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अशात आज शिंदे त्यांना भेटायला आले आहेत.
या भेटीनंतर बोलताना शशिकांत शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले आहे. मी सदिच्छा भेट घेतली. लगेच याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी कटूता कमी करण्याचे आवाहन केले आहे परंतु तो प्रतिसाद देत असताना त्यांनी सुद्धा तशा प्रकारचा वातावरण निर्मिती करणे गरजेचे आहे त्यांनी सुधाचा राजकारण करून अशी अपेक्षा, असं ते म्हणालेत.
Jammu Kashmir DSP House Fire: निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी अग्नितांडव, 6 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मिरमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. जम्मू काश्मिरच्या कठुआमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Maharashtra Congress News: महाराष्ट्र काँग्रेस चे नवे प्रदेशाध्यक्ष दिल्लीत ठरणार
महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला मंगळवारी सायंकाळी नागपूर ला पोहोचले आणि त्यांनी काँग्रेस भवनात बैठक घेतली. या दरम्यान त्यांनी विधानसभेतील 16 पैकी 15 आमदारांशी तसेच परिषदेतील 8 पैकी 7 आमदारांशी आणि विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांशी एकास एक अशी चर्चा केली. या दरम्यान त्यांनी त्यांची गट नेता आणि प्रदेशाध्यक्ष पदावर कोण असावे याविषयी मते जाणून घेताना त्यांना विधानसभा निवडणुकी दरम्यान प्रदेश काँग्रेस कमिटीकडून अपेक्षित मदत झाली काय, प्रतिसाद किती जलद होता, ई वी एम चा दोष वाटतो काय अशी प्रश्ने देखील विचारली. या बैठकीत हजेरी लावण्यासाठी काँग्रेस चे राज्यातील ज्येष्ठ नेत्यांपासून युवा नेते देखील उपस्थित होते.
Nandubar Child Death: नंदुरबार जिल्ह्यातील बालमृत्यू चिंतेच्या विषय सात महिन्यात 398 बालमृत्यू....
राज्यात सर्वाधिक बालमृत्यू होत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा समावेश असून नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील 398 बालकांचा मृत्यू झाल्याचं शासकीय आकडेवारीतून समोर आल आहे आदिवासी भागातील बालमृत्यू कमी करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून शासनाच्या विविध योजना राबविल्या जात असतात मात्र बालमृत्यू कमी होत नसतील तर या योजनांचा उपयोग काय असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे.
Dharashiv News: डीजे व डॉल्बीला उरूस काळात बंदी घालावी, पोलीस अधीक्षकाकडे मागणी
धाराशिव येथील जग प्रसिद्ध सूफी संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी यांचा उर्स १५ जानेवारी २०२५ पासुन सुरू होणार आहे. यामध्ये सात आठ दिवस वेगवेगळ्या मिरवणुका व वेगवेगळे कार्यक्रम होतात. होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये डीजे व डॉल्बी घालावी अशी मागणी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. डीजे व डॉल्बी उर्सानिमित्त खर्च होतो तो विधायक कामासाठी केला जावा असेही सकल मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
Dada Bhuse Meet Nitin Gadkari: मंत्री दादा भुसे यांनी घेतली केंद्रीय रस्ते मंत्री गडकरींची भेट
मंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेत मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मालेगाव बाह्य मतदार संघातील मुंगसे व झोडगे येथे उड्डाण पुल व सर्व्हिस तसेच मालेगाव शहरातून जाणाऱ्या कुसुंबा रोडला बायपास रोड करण्याची मागणी केली. यावेळी गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल मंत्री भुसे यांचा सत्कारही केला..