शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी!

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी (26 ऑगस्ट) रोजी कोसळला. या घटनेवर राज्यभर संतापाचं वातावरण आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी (26 ऑगस्ट) रोजी कोसळला. या घटनेवर राज्यभर संतापाचं वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात माफी मागितली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणात बुधवारी माफी मागितली होती. त्यापाठोपाठ मुख्यमंत्र्यांनीही माफी मागितली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं अतिशय दुर्दैवी आहे. पुतळ्याबाबत काल महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीत दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या दोन्ही समित्यांचा तपास समांतर सुरु राहील. नवा पुतळा उभारण्यावर आमचा भर असेल. नवा पुतळा भक्कम असेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शिवरायांची 100 वेळा माफी मागायला मी तयार आहे. मी महाराजांसमोर नतमस्तक आहे. शिवराय हा राजकीय विषय होऊ शकत नाही, असं मुख्यमंत्र्यानी यावेळी सांगितलं. 

( नक्की वाचा : 'शरद पवारांना हे शोभत नाही,' पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार )
 

जयदीप आपटेच्या पत्नीची चौकशी

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि  बांधकाम सल्लागार डॉ.चेतन पाटील यांना प्रमुख आरोपी करण्यात आले आहे. पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर जयदीप आपटे आपल्या राहत्या घरातून पळून गेला आहे. त्याचे कुटुंबीय देखील कल्याणमधील त्याच्या घरी नाहीत.

Advertisement

( नक्की वाचा : 'चुकीला माफी नाही', बीडच्या कार्यक्रमात अजित पवारांनी कुणाला दिला इशारा? )
 

सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटेची बायको निशिगंधा हिच्याशी संपर्क साधला असून ती तिच्या माहेरी असल्याचे त्यांना कळाले. सिंधुदुर्ग पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे. जयदीप आपटे कुठे आहे, याचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले असून निशिगंधा हिचा जबाब याचाच एक भाग आहे.