जाहिरात

'शरद पवारांना हे शोभत नाही,' पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सोमवारी (26 ऑगस्ट) कोसळला. या घटनेनंतर विरोधक आणि सत्तारुढ आमने-सामने आले आहेत

'शरद पवारांना हे शोभत नाही,' पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सोमवारी (26 ऑगस्ट) कोसळला. या घटनेनंतर विरोधक आणि सत्तारुढ आमने-सामने आले आहेत. मालवणमध्ये आज (28 ऑगस्ट) महाविकास आघाडीनं मोर्चा काढला होता. त्याचबरोबर राजकोट किल्ल्यावरही विरोधी आणि सत्तारुढ पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आमने-सामने आले होते. तर मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना उपमुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले फडणवीस?

मालवणमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. ही घटना घडल्यानंतर जे करणं आवश्यक होतं, ते सर्व करण्यात येईल. यामध्ये कुणीही राजकारण करु नये. या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. तसंच त्या ठिकाणी भव्य पुतळा उभारला पाहिजे असं फडणवीस यांनी सांगितलं.

नौदलानं हे प्रकरण गांभीर्यानं घेऊन चौकशी टीम तयार केली आहे. त्यांनी पाहणी केली आहे. नेव्ही दोषींवर कारवाई करेल. बांधकाम विभागानं पोलिसांंमध्ये तक्रार केली आहे. नेव्हीच्या रिपोर्टनंतर पोलीस कारवाई करतील. त्या टीममध्ये जे सिव्हिलियन होते, त्यांच्यावर कारवाई होईल. 

महाविकास आघाडीचा सरकारविरोधात एल्गार, 1 तारखेला मुंबईत... उद्धव ठाकरेंनी केली घोषणा

नक्की वाचा : महाविकास आघाडीचा सरकारविरोधात एल्गार, 1 तारखेला मुंबईत... उद्धव ठाकरेंनी केली घोषणा

पवारांना दिलं उत्तर

या प्रकरणात विरोधकांनी राजकारण सुरु केलं आहे. प्रत्येक गोष्ट निवडणुकीच्या जष्म्यानं पाहायचे असं राजकारण त्यांनी करु नये. या विषयाचं राजकारण महाराष्ट्राला शोभत नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, हा पुतळा नेव्हीनं तयार केला आहे. राज्यसरकारनं नाही, हे त्यांना माहिती आहे.  भ्रष्टाचार कुठंच नको. त्याला सर्वांनीच विरोध करावा. या प्रकराचं वक्तव्य करुन पवार इतर ठिकाणी त्याचं समर्थन करतात का? 

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे वक्तव्य केलं जात आहे. पवार साहेंबांसारख्या नेत्याला निवडणुका पाहून असं वक्तव्य करणे शोभत नाही, असं उत्तर फडणवीसांनी दिलं. नारायण राणे यांची बोलण्याची ती पद्धत आहे. ते धमकी देतील असं वाटत नाही, असंही फडणवीस यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com