कधी मुंबईतील झोपडपट्टीत लहानपण, आज जर्मनीत स्वत:च्या मालकीचं घर; GitHub Star संतोष यादवची प्रेरणादायी कहाणी

एकेकाळी मुंबईतील एका चाळीत राहायचे. मात्र आज जर्मनीतील एक दुमजली अपार्टमेंटचे मालक आहेत. त्यांची ही प्रेरणादायी कहाणी आपल्याला आयुष्यातील संकटाशी सामना करण्याचं बळ देईल.

जाहिरात
Read Time: 3 mins

Inspirational Story : उच्च पदावर पोहोचणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य सोपं नसते. काही तर वर्षानुवर्षे संघर्ष करतात. अशीच एक व्यक्ती आहे संतोष यादव. ते भारतीय वंशाचे आहेत आणि एकेकाळी मुंबईतील एका चाळीत राहायचे. मात्र आज जर्मनीतील एक दुमजली अपार्टमेंटचे मालक आहेत. त्यांची ही प्रेरणादायी कहाणी आपल्याला आयुष्यातील संकटाशी सामना करण्याचं बळ देईल.

त्यांनी एक्सवर पत्नीसोबत पूर्वी आणि आता असे फोटो शेअर केले आहेत. ज्यात १४ वर्षात त्यांचं आयुष्य कसं बदललं हे सांगितलं. 

आयुष्याच्या सुरुवातीलाच मोठी संकटं...

संतोष यादव यांनी सांगितलं की, त्यांचा जन्म मुंबईत झाला. ते एका झोपडपट्टीत राहत होते. तेथे चांगली माणसं आणि वाईट लोकही राहत होते. मी त्या वाईट लोकांच्या फारसा संपर्कात आलो नाही हे माझं नशीब. 

Advertisement

कमी गुण मिळाल्याने डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश...

संतोष यांनी सांगितलं की, शाळेच्या दिवसात ते थोडे आळशी होते. क्रिकेट त्यांचं प्रेम होतं. दहावीच्या परीक्षेत त्यांचा निकाल अत्यंत वाईट लागला. पुढे काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. त्यांना विज्ञान शाळेत प्रवेश घ्यायचा होता. मात्र मार्क कमी होते. त्यांच्या वडिलांच्या एका मित्राने डिप्लोमा कोर्सविषयी सांगितलं. त्यांची काहीही विचार न करता कम्प्युटर सायन्स निवडलं. मात्र यापूर्वी त्यांनी कधीच कम्प्युटरवर काम केलं नव्हतं. 


हिंदी माध्यमात अभ्यास, इंग्रजीचा गंध नाही...

हिंदी माध्यम शाळेत अभ्यास केल्यामुळे इंग्रजी त्यांना फारशी बोलता-लिहिता येत नव्हती. त्यांनी लिहिलं, एकेदिवशी मी वर्गातच ढसाढसा रडू लागलो. कारण वर्गात शिकवलेलं काहीच मला कळत नव्हतं. मी पुन्हा नापास होईल याची मला भीती होती. 


पहिलं प्रेम क्रिकेटपासून दुरावा, मित्रांनाही सारलं दूर...

जेव्हा इंटरनल परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळाले नाहीस तर त्यांची तयारी अधिक वाढवली. त्यांनी स्वत:ला सावरलं अन् जोरदार अभ्यास सुरू केला. क्रिकेट खेळणं सोडलं आणि मित्रांनाही दूर केलं. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात मी नापास होऊ नये अशी माझी इच्छा होती. त्यामुळे मी खूप अभ्यास सुरू केला. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेत मला बरे मार्क मिळाले. पहिल्या वर्षात ५० टक्के गुण मिळाले. शेवटच्या वर्षात ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. 

डिप्लोमानंतर संतोष यादवने सीएसचं शिक्षण घेण्यास रस निर्माण झाला. मात्र दुसऱ्याच वर्षी त्यांच्या वडिलांची नोकरी गेली. यावर संतोष यांनी लिहिलंय,  कुटुंबीयांनी त्यांना नोकरी शोधायला सांगितलं. कारण माझ्या सीएस पदवीची फी कुटुंबाला परवडत नव्हती. जी वर्षाला सुमारे ४२,००० रुपये (५५० अमेरिकन डॉलर) होती. मात्र त्यांची आई मुलाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. यानंतर २००४ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठात दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतला. या कालावधीत पाठ्यपुस्तकं खरेदी करायलाही त्यांच्याकडे पैसे नव्हते. शैक्षणिक वर्षाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अधिक बिघडली. 

Advertisement


५००० रुपयांची पहिली नोकरी...

संतोष यादव यांनी २००७ मध्ये उपासनाशी लग्न केलं. या दाम्पत्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. मंदीदरम्यान त्यांना पाच हजार रुपयांची पहिली नोकरी मिळाली. २०१० मध्ये, त्यांना C# वापरून विंडोज ॲप्लिकेशन्स कोड करण्याची दुसरी नोकरी मिळाली. ज्याचा मासिक पगार १२,००० होता. कामाचा भार फार जास्त नसल्यामुळे, त्यांनी C# आणि SQL मधील आपली कौशल्ये अधिक विकसित केली. २०११ मध्ये, ते एका स्टार्टअपमध्ये रुजू झाले. जिथे त्ंयाच्या पगारात ५०% पेक्षा जास्त वाढ झाली. त्यांनी तिथं पाच वर्षे काम केलं आणि त्यांना विमा व पेन्शनचे फायदेही मिळाले.


जर्मनीत झाले सेटल...

३६ वर्षीय संतोष यांनी जर्मनीत जाण्याचा निर्णय घेतला. तेथे जाण्यापूर्वी त्यांची पत्नी आणि मुलगी ८ वर्षांपर्यंत मुंबईतील एका झोपडपट्टीत राहत होते. आज संतोष CodeRabbit मध्ये प्रिंसिपल डेव्हलपर एडवोकेट म्हणून काम करतात. आणि AI शी संबंधित डेव्हलपर टूल्सवर लक्ष देतात. आपल्या लग्नाचा १७ वा वाढदिवस सादरा करण्यासाठी त्यांनी एक्सवर दोन फोटो शेयर केला. एक फोटो २०१२ मधील मुंबईतील घराचा आहे आणि दुसरा २०२६ मधील हॅम्बर्गचा. संतोष यादवने कॅप्शनमध्ये लिहिलंय, सुरुवात कशी झाली, आता कसं सुरू आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article