Mumbai News: झिंज्या उपटल्या, डोकं फोडलं, लोकलमध्ये महिलांच्या डब्यात तुफान राडा, Video viral

ज्या वेळी हा राडा सुरू होता, त्यावेळी त्याचा एक व्हिडीओ काढला गेला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकलमध्ये प्रवास करणे हे जिकरीचे झाले आहे. अनेक वेळा गर्दी मुले कुणाचा जीव जातो तर अनेक वेळा हाणामारीचे प्रसंग उद्भवतात. नुकताच मुंब्रा इथं लोकलचा अपघात झाला. त्यात काही जणांना आपले जीव गमवाले लागले. ही घटना ताजी असतानाच लोकलमध्ये राडा झाल्याची घटना समोर आली आहे. हा राडा महिलांच्या डब्ब्यामध्ये झाला. हा राडा इतका मोठा होता की त्यात एका महिलेचं डोकं फुटलं. तर दुसऱ्या महिलेच्या झिंज्या उपटल्या गेल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ही घटना चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या लेडीज स्पेशल लोकलमध्ये घडली. संध्याकाळी ही लोकल चर्चगेटहून सुटली. त्यानंतर ती अंधेरी स्थानकात पोहोचली. यावेळी ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यावेळी चढणाऱ्या महिलेचा धक्का दुसऱ्या मुलीला लागला. त्यामुळे त्या दोघींमध्ये वाद झाला. तो वाद इतका टोकाला गेली की एकमेकींमध्ये हाणामारी झाली. एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या डोक्यात मोबाईलने हल्ला चढवला. त्यात दुसऱ्या महिलेचे डोकं फुटलं. त्यामुळे चवताळलेल्या दुसऱ्या महिलेने समोरच्या महिलेच्या झिंज्या उपटल्या. यामुळे एकच गोंधळ लोकलमध्ये झाला. 

ट्रेंडिंग बातमी - Love Story : होणाऱ्या सुनेसोबत पळून जाऊन सासऱ्यानं केलं लग्न, रात्रीच्या Video कॉलमध्ये आले जवळ

ज्या वेळी हा राडा सुरू होता, त्यावेळी त्याचा एक व्हिडीओ काढला गेला. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियीवर व्हायर होत आहे. राडा वाढत गेल्याने पुढे लोकल भाईंदर इथं थांबली. त्यावेळी या दोन्ही महिलांना खाली उतरवण्यात आले. त्यांना आरपीएफने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना भाईंदर रेल्वे पोलिस स्थानकात नेण्यात आलं. त्यात ज्योती प्रसाद सिंह ही 21 वर्षाची तरूणी आणि कविता मेदडकर असं भांडण करण्याऱ्या महिलांची नावं आहेत. दोघी ही नोकरी करता. ज्योती ही नायगाव इथं राहाणारी आहे. तर कविता ही विरारला राहाणारी असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Crime News: दुकानामागे लघुशंका का केलीस? कोंबड्या कापण्याच्या सुऱ्यानेच सपासप वार अन्...

त्यांची चौकळी केली असता गाडीत चढताना आमच्यात वाद झाला. त्यातून हाणामारी झाली आहे. पण आम्हाला एकमेकीं विरोधात कोणतीही तक्रार द्यायची नाही असं या दोघींनी ही सांगितली. शिवाय आम्ही हे प्रकरण आपसात मिटवत असल्याचं ही त्यांनी सांगितलं. त्यांच्याकडून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक भगवान डांगे यांनी दिली आहेत. ते वसई रोड रेल्वे पोलिस मध्ये कार्यरत आहे. 

Advertisement