जाहिरात

Crime News: दुकानामागे लघुशंका का केलीस? कोंबड्या कापण्याच्या सुऱ्यानेच सपासप वार अन्...

नितीन, सचिन आणि दत्ता हे दुकानातून चिकन घेऊन बाजूलाच असलेल्या हॉटेलात जेवण करण्यासाठी गेले होते.

Crime News: दुकानामागे लघुशंका का केलीस? कोंबड्या कापण्याच्या सुऱ्यानेच सपासप वार अन्...
छत्रपती संभाजीनगर:

छोट्या छोट्या गोष्टीवरून सध्या मोठ मोठे गुन्हे होत आहे. कुणाला कसला राग येईल याचा मात्र नेम नाही. असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगर इथं घडली आहे. दुकानामागे लघुशंका का केली? याचा राग धरून दुकान मालकाने थेट लघू शंका करणाऱ्या तरूमाचा मुडदाच पाडला आहे. या मुळे छत्रपती संभाजीनगरात एकच खळबळ उडाली आहे. यात एकाचा मुडदा पाडला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दुकानामागे लघुशंका केली या कारणावरून एकाची हत्या करण्यात आली आहे. यात दोघे जण गंभीर जखमी ही झाले आहेत. नितीन सोनाजी शंकपाल असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर सचिन सोनाजी शंकपाल आणि दत्ता बालाजी जाधव हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना आणि समीर शेख अशी आरोपीची नावे आहेत. हे दोघे ही तर चिकन शॉपवर काम करत होते. 

ट्रेंडिंग बातमी - Uddhav Thackeray: राज ठाकरेंबरोबर युती होणार? उद्धव ठाकरेंचं सुचक वक्तव्य काय?

दोघांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. नितीन, सचिन आणि दत्ता हे दुकानातून चिकन घेऊन बाजूलाच असलेल्या हॉटेलात जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करून ते हॉटेलबाहेर झाडाखाली थांबले होते. तेव्हा तिघांपैकी एक जण कुरेशीच्या दुकानामागे लघुशंकेसाठी गेला. तिथे कुरेशीच्या दुकानातील समीरने लघुशंका करणाऱ्याला शिवीगाळ केली. तिथे लघूशंका का करतोस. दुसरीकडे जाता येत नाही का अशी विचारणा केली. 

ट्रेंडिंग बातमी - Love Story : होणाऱ्या सुनेसोबत पळून जाऊन सासऱ्यानं केलं लग्न, रात्रीच्या Video कॉलमध्ये आले जवळ

यावेळी शिवीगाळही करण्यात आली. दोन्ही बाजून वाद वाढला. तो वाद इतका टोकाला गेला की मस्तान उर्फ नन्ना हा धावत चिकन शॉपमध्ये गेला. त्याने कोंबड्या कापण्याचा सत्तूर घेतला. त्यानंतर तो त्या तिघांच्या ही अंगावर धावून गेला. शिवाय त्याने त्या सत्तूरच्या माध्यमातून त्याने त्या तिघांवर सपासप वार केले.चेहरा,डोकं,मानेवर त्याने जबर वार केले. त्यात नितीन हा रक्ताच्या थोरळात पडला. त्याच्यावरचा हल्ला हा जबर होता. त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. अन्य दोघे या हल्ल्यात जखमी झाले. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com