अविनाश पवार, पुणे
CIBIL स्कोअर चांगला नसेल तर बँका लोन देण्यास टाळाटाळ करतात. किंवा सिबिल स्कोअर चांगला असेल तर अनेक इन्स्टंट लोन, प्री अप्रुव्ह लोन, कमी व्याजदर अशा अनेक सुविधा मिळतात. त्यामुळे सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी अनेकांचा कल असतो. मात्र सिबिस स्कोअर खराब असेल तर लग्नाला मुलगी देखील मिळणार नाही, अशी नवी समस्या तरुणांसमोर उभी राहिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विवाह जुळवणीच्या मार्गात 'सिबिल'चा म्हणजे क्रेडिट इन्फोर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड या पतमानांकनाचा नवा अडथळा तयार होताना दिसत आहे. वधू पक्षाकडून अन्य बाबींबरोबरच 'सिबिल' चीही पडताळणी केली जात असल्याने लग्नाळुंच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या दशक - दीड दशकांत मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. साहजिकच मुलींच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
(नक्की वाचा- Saif Ali Khan Attack: लग्न मोडलं, नोकरी गेली; सैफ हल्ला प्रकरणानंतर तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त)
या पात्रता निकषांचे अडथळे पार करताना वर पक्षाला नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे. आता यात नव्या एका 'स्पीड ब्रेकर'ची भर पडली आहे. वधू पक्षाकडून वराचा किंवा त्याच्या कुटुंबातील प्रमुखाचा 'सिबिल' स्कोअर तपासले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. वधू पक्षाकडून 'सिबिल' अहवाल काढला जात आहे. त्यामुळे कोणत्या बँकेत किती कर्ज आहे, त्याचे हप्ते कसे भरले आहेत की कर्ज थकीत आहे, अन्य कोणाच्या कर्जाला जामीन आहे काय अशी माहिती तपासून पाहिली जात आहे.
लग्न जमवताना सामाजिक भान ठेवून व अर्थिक टंचाई आपल्या वधूला येऊ नये याची काळजी पाल्यांकडून घेतली जात आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड मराठा वधू-वर संस्था मंचरचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
(नक्की वाचा- अर्रर्र.. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाला पत्नीने रंगेहाथ पकडलं, थेट घराबाहेर काढलं; VIDEO झाला व्हायरल)
CIBIL म्हणजे काय?
CIBIL स्कोअरद्वारे ग्राहकाच्या क्रेडिट हिस्ट्रीबद्दल माहिती मिळते. सिबिल स्कोअर तीन गुणांचा आहे. एखाद्या व्यक्तीची कर्ज घेण्याची आणि त्याची परतफेड करण्याची क्षमता मोजण्याचा हा एक मार्ग आहे. म्हणजे हे क्रेडिट प्रोफाइल आहे. CIBIL स्कोअरची श्रेणी 300 ते 900 दरम्यान आहे. एखाद्या व्यक्तीला 300 ते 900 दरम्यान क्रमांक दिले जातात. CIBIL स्कोअर 900 च्या जितके जवळ असेल तितके चांगले. सिबिल स्कोअर चांगला असेल तर कर्ज मिळणे सोपे होते. 750 वरील कोणताही स्कोअर चांगला मानला जातो.