CIDCO house prices will decrease : सर्वसामान्यांना परवडणारं आणि हक्काचं घर मिळवून देणाऱ्या सिडकोची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सिडकोच्या घरांच्या किमती दीड ते दोन लाखांनी कमी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिडकोच्या घराच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेअंतर्गत परवडणारी घरं दिली जात असल्याचा राज्य सरकारकडून दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात याच्या किमती सोडतधारकांना परवडत नसल्याचं दिसत आहे. या वाढलेल्या दराविरोधात अनेकदा निदर्शने आणि निवेदने सादर करण्यात आली आहे. अखेर आज उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यावर विचार केला जाणार असून सिडकोच्या घराच्या किमती कमी करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माहिती अधिकारात धक्कादायक माहिती आली होती समोर...
35 लाखांना उभारले जाणारे घर थेट 75 लाखांपासून 96 लाखांपर्यंत विक्रीस ठेवण्यात आल्याचं माहिती अधिकारात समोर आलं होतं. जे घर सिडकोने अंदाजे 35 लाखांत बांधलं आहे, त्याची विक्री किंमत 75 लाख 10 हजार इतकी ठेवण्यात आली आहे. म्हणजेच जवळपास 100 ते 120 टक्के नफा कमवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या लॉटरीत 75लाखां पासून सुरुवात होणाऱ्या किंमतीमुळे सामान्य नोकरदार, मध्यमवर्गीय कुटुंबांना हे घर परवडणं शक्यच नसल्याचं चित्र आहे. ही घरे खरंच सर्वसामान्यांसाठी आहेत का?" असा प्रश्न उपस्थित होतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world