जाहिरात

CIDCO News: 40 लाखाचं सिडकोचं घर आता कितीला मिळणार? घर सरेंडर करणाऱ्यांनाही नवी संधी, पुन्हा घर मिळणार

सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या परंतु घरे परत (सरेंडर) केलेल्या अर्जदारांना देखील सुधारित अटींनुसार पुन्हा एकदा योजनेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे.

CIDCO News: 40 लाखाचं सिडकोचं घर आता कितीला मिळणार? घर सरेंडर करणाऱ्यांनाही नवी संधी, पुन्हा घर मिळणार
  • सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी २६,००० घरं नवी मुंबईत उपलब्ध करून दिली होती
  • घरांच्या मूळ किंमती जाहीर झाल्यानंतर अनेकांनी अर्ज मागे घेतले
  • आता या घरांच्या किंमतीत दहा टक्के कपात करण्यात आली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी मुंबई:

राहुल कांबळे 

सिडकोने माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केली होती.  या योजने अंतर्गत 26,000 घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. ही घरं  नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर (प), खारघर (पू) (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध होती. यासाठी सुरूवातील चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र ज्यावेळी या घरांच्या किंमती जाहीर झाला त्यावेळी अनेकींनी अर्ज मागे घेतली. तर काहींनी घर लागूनही सरेंडर केले. आता याच घरांच्या किंमती दहा टक्कांनी कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे घर आवाक्यात येणार आहे. शिवाय ज्या लॉटरी विज्येत्यांनी ही घरं सरेंडर केली आहेत त्यांनाही एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सिडकोची जी घरं होती ती अगदी 25 लाखापासून ती अगदी 97 लाखां पर्यंत होती. या घरांच्या किंमती आता 10 टक्क्यांनी कमी होणार आहेत. म्हणजेच 25 लाखाचे असलेले घर हे आता अडीच लाखांनी कमी होणार आहे. म्हणजेच हे घर आता 22 लाख पन्नास हजारांना मिळणार आहे. शिवाय जर हे घर EWS मध्ये असेल तर त्याला 2.5 लाखांची पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सबसीडी ही मिळणार आहे. त्यामुळे हे घर 20 लाखात मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना घर मिळाले आहे त्यांच्यासाठी दिवासा देणारा ठरणार आहे. 

नक्की वाचा - CIDCO Home : नवी मुंबईतील सिडकोच्या घरांचे दर 10 टक्क्यांनी कमी; 17,000 घरांच्या लॉटरीबाबत सरकारचा मोठा निर्णय

EWS संवर्गात कळंबोली बस डेपो इथं असलेली घर हे सर्वात महाग होते. त्या घराची किंमत ही  41.9 लाख रूपये होती. पण दहा टक्के किंमत कमी झाल्यानंतर हेच घर आता 36 लाखात मिळणार आहे. शिवाय यावर अडीच लाखांची सबसीडी असणार आहे. त्यामुळे हे घर 34 लाखापर्यंत मिळेल. त्यामुळे या कॅटेगिरीतील लॉटरी धारकांना त्याचामोठा दिलासा मिळणार आहे. खारघर बस डेपो मध्ये याच कॅटेगिरीमध्ये घरांची किंमत 48.3 लाख होती. हे घर ही नव्या किंमती नुसार जवळपास 43-44 लाखापर्यंत मिळणार आहे. शिवाय याला ही अडीच लाखांची सबसीडी मिळणार आहे.

नक्की वाचा - Food Sattvik: देवाच्या प्रसादात कांदा-लसूण का वापरत नाहीत? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे

दहा टक्के दर कमी केल्यामुळे अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घरे लक्षणीयरीत्या अधिक परवडणारी ठरणार आहेत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घरखरेदीदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ₹2.5 लाखांच्या अनुदानासोबतच 10% स्वस्त किंमतींचा एकत्रित लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकूण आर्थिक भार कमी होऊन घर घेणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच, या योजनेच्या 19 फेब्रुवारी 2025 रोजी काढलेल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या परंतु घरे परत (सरेंडर) केलेल्या अर्जदारांना देखील सुधारित अटींनुसार पुन्हा एकदा योजनेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी या अर्जदारांना वाटप झालेले घर निश्चित करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदती दरम्यान संबंधित अर्जदारांना https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

“महाराष्ट्र शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या योजनेअंतर्गत (दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रारंभ) बामणडोंगरी, कळंबोली, खारकोपर, खारघर, खांदेश्वर, मानसरोवर, पनवेल, वाशी व तळोजा या सर्व नोडमधील घरांच्या किंमती देखील १०% नी स्वस्त झाल्या आहेत. ही सुधारित किंमत विद्यमान लाभार्थी तसेच भावी अर्जदार दोघांनाही लागू राहणार आहेत.”
श्री. विजय सिंघल उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

घरांच्या जून्या किंमती, या किंमतीत आता 10 टक्के सुट मिळणार 

EWS म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक 

  • तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख 
  • तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख 
  • खारघर बस डेपो - 48. 3 लाख 
  • बामणडोंगरी -31. 9 लाख 
  • खारकोपर  2A, 2B -38.6 लाख 
  • कळंबोली बस डेपो  - 41.9 लाख 

LIG अल्प उत्पन्न गट 

  • पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख
  • खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख 
  • तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख 46.4 लाख 
  • मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख 
  • खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख 
  • खारकोपर ईस्ट - 40.3 लाख 
  • वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख 
  • खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख

Listen to the latest songs, only on JioSaavn.com