- सिडकोने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 4508 घरांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते
- 22 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या अर्ज प्रक्रियेत सुरुवातीला अडचणी आल्या होत्या पण नंतर समस्या सुटल्या
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या सदनिका उपलब्ध होत्या.
राहुल कांबळे
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना सिडकोने जाहीर केली होती. या योजनेसाठी 4508 घरांसाठी इच्छुकांकडून अर्जही मागवण्यात आले होते. 22 नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज मागवले गेले. सुरूवातील ऑनलाईन अर्ज करताना अडचणी येत होत्या. पण त्यानंतर ही अडचण दुर झाली. त्यानंतर मात्र सिडकोच्या या योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची 21 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. या दिवसापर्यंत रेकॉर्ड ब्रेक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या योजनेत घर मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
सिडकोतर्फे तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील शिल्लक राहीलेल्या 4,508 सदनिकाची नवी योजना जाहीर केली होती. ही या योजनेत सोडत काढली जाणार नव्हती. तर जो पहीला येईल त्याला ते घर अशी ही योजना होती. शिवाय ही घरं रेडी टू मूव्ह स्वरूपाची आहेत. त्यामुळे पैसे भरा आणि लगेच घराचा ताबा मिळवा अशी संधी होती. त्यामुळे या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. जळळपास 4,508 सदनिकांसाठी हे अर्ज मागवण्यात आले होते. 21 नोव्हेंबर पर्यंत या घरांसाठी तब्बल 34 हजार जणांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका घरा मागे सरासरी दहा अर्ज आले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता 1,115 तर अल्प उत्पन्न गटाकरिता 3,393 सदनिका या योजनेत उपलब्ध होत्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सदनिकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रु. 2.50 लाख अनुदान मिळणार आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीकरिता cidcofcfs.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले होते. इथेच सदनिकेचे क्षेत्रफळ, किंमत इतर गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. ही योजना जाहीर झाल्यानंतर अनेकांनी त्यासाठी इच्छा दाखवली. किंमती आवाक्यात असल्याने अनेकांनी यासाठी अर्ज केले आहेत.
ऑनलाइन अर्ज नोंदणी दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 04.00 वाजेपासून सुरू करण्यात आले होते. 21 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती. ती मुदत आता संपली आहे. जवळपास 34 हजार जणांनी घर घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यातील पात्र अर्जदारांना 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून त्यांच्या पसंतीच्या सदनिकेची निवड करता येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सदनिकांची विक्री केली जाणार आहे. त्यामुळे आता अर्ज केलेल्या सर्वांना 28 तारखेची प्रतिक्षा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world