जाहिरात

CIDCO Lottery : सिडकोची 'परवडणारी' घरे सर्वसामान्यांना परवडेना! घरांच्या किमती पाहून ग्राहकांना फुटला घाम!

सिडकोने 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेतील घरांच्या किमती पाहून सर्वसामान्यांचे डोळे विस्फारले. 

CIDCO Lottery : सिडकोची 'परवडणारी' घरे सर्वसामान्यांना परवडेना! घरांच्या किमती पाहून ग्राहकांना फुटला घाम!

सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या सिडको योजनेतील घरांच्या किमती अखेर जाहीर झाल्या. मुंबईत किंवा मुंबईजवळ आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र सद्यपरिस्थितीत मुंबईतील लहान घरांच्या किमती कोटींमध्ये गेल्या आहेत. अशावेळेस सर्वसामान्यांना सिडकोचा आधार वाटत असतो.  सिडकोने 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेतील घरांच्या किमती पाहून सर्वसामान्यांचे डोळे विस्फारले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

खारघर स्टेशन सेक्टर वन A येथे 97.2 लाखांचं घर सिडकोने जाहीर केलं आहे. 1803 सदनिका असलेल्या या घराचा कार्पेट एरिया 540 इतका आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आयोजित केलेल्या या योजनेत 97.2 लाखांच घर घेताना सर्वसामान्यांच्या तोंडाला फेस येईल. त्याशिवाय अल्प उत्पन्न बचत गटातील सदनिकेची किंमत 74 लाखांपर्यंत आहे. अशी 3131 घरं सिडकोकडून देण्यात आली आहेत. या घरांचा कार्पेट एरिया 322 इतका आहे. मात्र या किमती अव्वाच्या सव्वा असल्याने सर्वसामान्यांना कशी परवडणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.     

CIDCO Lottery : सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती जाहीर, 25 लाखांपासून मिळणार स्वप्नांचं घर, अर्जाची अंतिम मुदत कधीपर्यंत?

नक्की वाचा -  CIDCO Lottery : सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती जाहीर, 25 लाखांपासून मिळणार स्वप्नांचं घर, अर्जाची अंतिम मुदत कधीपर्यंत?

गट EWS ( आर्थिक दुर्बल घटक - कार्पेट 322 )
तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख 
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख 
खारघर बस डेपो, सेक्टर 14 - 48. 3 लाख 
खारकोपर  2A - 38.6 लाख 
खारकोपर  2B - 38.6 लाख 
कळंबोली बस डेपो  - 41.9 लाख 

Latest and Breaking News on NDTV


बामणडोंगरी -31. 9 लाख 
अल्प उत्पन्न गट एलआयजी -LIG
पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख 
तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख /46.4 लाख 
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख 
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख खारकोपर ईस्ट - 40.3 लाख 
वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख 
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com