CIDCO Lottery News: सिडकोतर्फे यंदा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील गृहसंकुलांतील 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आलीय. यापैकी 1 हजार 115 घरं प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर 3 हजार 393 घरं या अल्प उत्पन्न गटाकरिता उपलब्ध आहेत. या सदनिका राहण्याच्या दृष्टीने तयार (Ready to move) असून त्यांचा ताबा देखील लगेच मिळणार आहे.
सिडकोच्या घरांच्या सोडतीचं वैशिष्ट्य काय?
- आपल्या पसंतीचं घर निवडण्याचे अर्जदारांना असलेले स्वातंत्र्य हे या गृहनिर्माण योजनेचे वैशिष्ट्य आहे.
- प्रथम अर्ज करणाऱ्या अर्जदारास त्याच्या पसंतीचे घर मिळणार आहे.
- गृहनिर्माण योजनेतील सर्व प्रक्रिया या पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहेत.
सिडकोचे घर घ्यायचं असेल तर या नियमांचं पालन केलेच पाहिजे?
सर्वसाधारण अटी (आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट व सर्वसाधारण प्रवर्गाकरीता)
- अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
- महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्षाचे वास्तव्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी वर्ष 2018 नंतरचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील. जर वर्ष 2018 पूर्वीचे अधिवास प्रमाणपत्र असल्यास संबंधित प्राधिका-याकडून किंवा आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नवीन अधिवास प्रमाणपत्र काढून घेण्यात यावे.
- अर्ज एका व्यक्तीच्या किंवा संयुक्त नावाने करता येईल. संयुक्त अर्जामध्ये सहअर्जदार हा केवळ पती/पत्नी असू शकेल. तसेच अर्जदार अविवाहित असल्यास, सहअर्जदार म्हणून आई असू शकेल. सहअर्जदार यांनी उपरोक्त सर्व पात्रता निकषांची पुर्तता करणे आवश्यक आहे.
विशेष अटी
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी (पंतप्रधान आवास योजने अंतर्गत) बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी पात्रता निकष :
- अर्जदार किंवा त्याची पती/पत्नी त्यांची अज्ञान मुले यांचे नावे संपूर्ण भारतात कुठेही पक्के घर नसावे.
- अर्जदाराचे सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 6,00,000/- रुपयांपर्यंत असावे. 'कौटुंबिक वार्षिक उत्पन्न' म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे एकट्याचे, त्यांची पती/पत्नी यांचे वार्षिक उत्पन्न असल्यास दोघांचे मिळून नोकरीव्दारे अथवा उद्दयोगधंद्यापासून, जीवितार्थाचे योजनेत दिलेल्या वित्तीय वर्षाकरीता पूर्वीच्या सलग 12 महिन्यांचे एकूण उत्पन्न म्हणजे दिनांक 01/04/2025 ते 31/03/2025 या कालावधीत झालेल्या प्राप्तीवरुन परिगणित करण्यात यावे. उत्पन्न पुरावा म्हणून तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र सादर करावे.
- जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र. (लागू असल्यास) तसेच इतर आरक्षित प्रवर्गाकरिताचे प्रमाणपत्र योग्य त्या नमुन्यामध्ये सादर करावे. (लागू असल्यास)
- घराचा विक्री करारनामा केल्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षाच्या कालावधीत फेरविक्री / हस्तांतरण करता येणार नाही. पाच वर्षाच्या कालावधीनंतर नियमानुसार महामंडळाच्या लेखी परवानगीनंतर आणि लागू असलेल्या हस्तांतरण शुल्काचा भरणा केल्यानंतर खालीलप्रमाणे विक्री करता करता येईल
- अ) संविधानिक आरक्षण प्रवर्ग (SC/ST/NT/DT) मधील अर्जदारांच्या सदनिकांची फेरविक्री/हस्तांतरण त्याच आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींना करता येईल.
- आ) इतर आरक्षण प्रवर्ग (दिव्यांग, राज्य शासकिय कर्मचारी, पत्रकार, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, माथाडी कामगार, इ.) मधील अर्जदारांच्या सदनिकांची फेरविक्री/हस्तांतरण कुठल्याही प्रवर्गात करता येईल.
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्जदारांनी केंद्र शासनाच्या http://pmaymis.gov.in या संकेत स्थळावर अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. पती/पत्नीचे आधारकार्ड, त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जदाराने सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदार कुटुंबात प्रौढ महिला असल्यास सदर महिलेच्या नावाने किंवा सदर महिला आणि तिचा पती यांच्या संयुक्त नावे अर्ज करण्यात यावा, ज्या कुटुंबात प्रौढ महिला सदस्य नाही अशा कुटुंबातीलच पुरूषांच्या नावे अर्ज करता येऊ शकेल.
- अर्जदार अविवाहित असल्यास त्याने त्याबाबतची समंती अर्ज सादर करताना नमूद करणे आवश्यक आहे.
- आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील यशस्वी अर्जदारांना खालीलप्रमाणे आर्थिक अनुदान प्राप्त होईल : केंद्र शासन - दीड लाख रुपये , राज्य शासन - एक लाख रूपये
- अनुदानाची रक्कम ही यशस्वी अर्जदारांच्या हप्त्याच्या रक्कमेमध्ये केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यावर समायोजित करण्यात येईल. जर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानाची रक्कम कोणत्याही कारणस्तव प्राप्त झाली नाही तर सदरची रक्कम ही यशस्वी अर्जदारांकडून वसूल करण्यात येईल.
4,508 homes. 5 major nodes.
— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) November 24, 2025
One historic chance! 🏡✨
CIDCO's First Come, First Served Housing Sale
Don't miss your opportunity!
Locations:Taloja • Dronagiri • Kalamboli • Kharghar • Ghansoli
🔗 Apply only on the official website:https://t.co/KWgInGGenA
४५०८ घरे. ५… pic.twitter.com/uSTVgv2h26
सर्वसाधारण प्रवर्गाकरिता पात्रता निकष
अर्जदार किंवा त्यांची पत्नी/पती किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्त्वावर, भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून नवी मुंबईत घर नसल्याबाबत तसेच यापूर्वी अर्जदाराने त्याचे पत्नी/पती अथवा अज्ञान मुलांच्या नावे सिडकोच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेत लाभ घेतला नसावा.
- सर्वसाधारण प्रवर्गाकरिता वार्षिक उत्पन्न (2024-2025) सहा लाखापेक्षा अधिक असावे.
- जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास) तसेच इतर आरक्षित प्रवर्गाकरिताचे प्रमाणपत्र योग्य त्या नमुन्यामध्ये सादर करावे. (लागू असल्यास)
- सदर सदनिका विक्री करारनामा केल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षाच्या कालावधीकरीता फेरविक्री/हस्तांतरण करता येणार नाही. तीन वर्षाच्या कालावधीनंतर नियमानुसार महामंडळाच्या लेखी परवानगीनंतर व लागू असलेल्या हस्तांतरण शुल्काचा भरणा केल्यानंतर खालीलप्रमाणे विक्री करता करता येईलः-
- संविधानिक आरक्षण प्रवर्ग (SC/ST/NT/DT) मधील अर्जदारांच्या सदनिकांची फेरविक्री/हस्तांतरण त्याच आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींना करता येईल.
- इतर आरक्षण प्रवर्ग (दिव्यांग, राज्य शासकिय कर्मचारी, पत्रकार, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, माथाडी कामगार, इ.) मधील अर्जदारांच्या सदनिकांची फेरविक्री/हस्तांतरण कुठल्याही प्रवर्गात करता येईल.
- अनामत रक्कम : आर्थिकद्दष्ट्या दुर्बल घटक- 75 हजार रूपये
- अल्प उत्पन्न गट : 1 लाख 50 हजार रूपये
CIDCO News: ऑनलाइन अर्ज नोंदणीतल्या अडचणी दुर होणार? 4,508 घरांसाठी 2 दिवसात किती अर्ज?
आवश्यक कागदपत्रं
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- DG-Lockerमध्ये सर्व कागदपत्रं असणं आवश्यक
- उत्पन्नाचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र
- विकलांग असल्याबाबतचे UDID कार्ड
अन्य आरक्षण प्रवर्ग: नोंदणी आवश्यकतेनुसार कागदपत्रं सादर करावी
- पत्रकार
- माथाडी कामगार
- प्रादेशिक अल्पसंख्यांक
- प्रकल्पग्रस्त
- सिडको कर्मचारी
- माजी सैनिक
- शासकीय कर्मचारी

Photo Credit: CIDCO
अर्ज नोंदणी करण्याची प्रक्रिया- www.cidcofcfs.cidcoindia.com या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी.
- ऑनलाइन अर्जसाठी नोंदणी आणि शुक्ल भरण्याकरिता 22 नोव्हेंबरपासून सुरू झालीय.
- 28 डिसेंबरपासून सकाळी 11 वाजल्यापासून अर्जदारांसाठी घरं निवडण्याची प्रक्रिया सुरू होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
