जाहिरात

CIDCO News: सिडकोचं स्वप्नातलं घर मिळणार! 8795 घरांची लॉटरी जाहीर, अन्य घरांच्या लॉटरीबाबत सस्पेन्स

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांच्या हस्ते ही लॉटरी काढण्यात आली.

CIDCO News: सिडकोचं स्वप्नातलं घर मिळणार! 8795 घरांची लॉटरी जाहीर, अन्य घरांच्या लॉटरीबाबत सस्पेन्स
  • सिडकोच्या माझ्या स्वप्नातलं घर योजनेअंतर्गत ८७९५ ईडब्ल्यूएस सदनिकांची लॉटरी काढण्यात आली आहे
  • या योजनेअंतर्गत तळोजा, कळंबोली, खारघर, उलवे आणि खारकोपर भागात मोक्याच्या ठिकाणी घरं दिली जाणार आहेत
  • योजनेला एकूण १०८३२ अर्ज मिळाले होते. लॉटरीमध्ये अनेकांना घरे मिळाली होती
नवी मुंबई:

सिडकोचं माझ्या स्वप्नातलं घर या  योजने अंतर्गत जवळपास 8 हजार 795 घरांची लॉटरी अखेर काढण्यात आली. बहुप्रतिक्षीत या लॉटरीला सोमवारचा मुहूर्त मिळाला. त्यामुळे आपल्याला घर मिळेल या आशेवर असलेल्या अनेकांसाठी सोमवार हा आनंदाचा दिवस ठरला आहे. सिडकोने 'माझे पसंतीचे सिडकोचे घर माझा पहिला चॉइस' या योजने अंतर्गत अर्ज मागवले होते. ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ही घरे होती. त्याला प्रतिसाद ही चांगला मिळाला होता. मात्र त्याची लॉटरी काही कारणास्तव अडकली होती. मात्र आता ती संगणकीय सोडत काढण्यात आली आहे. 

ही योजना डिसेंबर 2025 मध्ये जाहीर करण्यात आली होती. या योजने अंतर्गत तळोजा, कळंबोली, खारघर, उलवे आणि खारकोपर या भागात ही घरं उपलब्ध करून देण्यात आली होती. ही घरं अगदी मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांना मागणी ही मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे लॉटरी जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आले होते. या भागात जवळपास  8,795 ईडब्ल्यूएस सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. या घरांसाठी जवळपास 10 हजार 832 अर्ज आले होते.

नक्की वाचा - Delhi Protest:'आधी राजीनामा, नंतरच चर्चा', विरोधकांचा हंगामा, लोकसभेचे कामकाज सलग तिसऱ्या दिवशी ही ठप्प

या लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया संगणकीय होती. मानवी हस्तक्षेपविरहित आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने ही पार पडल्याचा दावा सिडकोने केला आहे. ज्या पात्र अर्जदारांना घर मिळाले आहे त्यांचे नाव अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संगणकीय सोडत केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील सदनिकांसाठी आयोजित करण्यात आली होती. मात्र उर्वरित प्रवर्गातील सदनिकांची सोडत अजून ही रखडली आहे.  मुंबई उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत ही लॉटरी  स्थगित ठेवण्यात आल्याचं सिडकोने स्पष्ट केले आहे.

नक्की वाचा - दिल्लीच्या राजकारणात मोठी घडामोड! शरद पवार,सुप्रिया सुळे PM मोदींच्या भेटीला; भेटीचं कारण आलं समोर

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांच्या हस्ते ही लॉटरी काढण्यात आली. या वेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल उपस्थित होते. ही घरे मिळाल्यामुळे अनेकांचे स्वप्नातले घर घेण्याचे स्वप्न साकार झाले आहे. ही घरं नवी मुंबई विमानतळापासून जवळ आहेत. शिवाय ज्या पद्धतीने या पट्ट्याचा विकास होत आहे ते पाहात ही घरे आता घेणे फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे अनेकांनी ही घरे घेण्याची तयारी दर्शवली होती. या घरांसाठी ही दुसरी लॉटरी आहे. आधी या घरांच्या किंमती मुळे वाद झाला होता. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com