जाहिरात

Navi Mumbai: उरणमध्ये भंगार माफियांचा सुळसुळाट! सिडकोच्या 5 एकर जागेवर कब्जा, सुरक्षेचा गंभीर प्रश्न

Navi Mumbai: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी (JNPT) बंदर परिसरातील सिडकोच्या सुमारे 5 एकर जमिनीवर भंगार माफियांनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.

Navi Mumbai: उरणमध्ये भंगार माफियांचा सुळसुळाट! सिडकोच्या 5 एकर जागेवर कब्जा, सुरक्षेचा गंभीर प्रश्न

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी बंदरामुळे उरण व नवी मुंबई परिसर देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. सुरक्षेच्या दृष्टीने हा संपूर्ण भाग अत्यंत संवेदनशील असतानाच, उरण तालुक्यात सिडकोच्या मोकळ्या जागांवरील अतिक्रमणाने नागरिक व स्थानिक प्रशासनाची चिंता वाढवली आहे. येथील सिडकोच्या सुमारे 5 एकर शासकीय जागेवर भंगार माफियांनी ताबा मिळवून मोठमोठे शेड उभारले असून बेकायदेशीर वजनकाटे सुरू केल्याचे समोर आले आहे.

'लाला' नावाच्या भंगार व्यावसायिकावर आरोप

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आणि परिसरात सुरू असलेल्या चर्चांनुसार, "लाला" या नावाने ओळखला जाणारा एक मोठा भंगार व्यावसायिक या संपूर्ण बेकायदेशीर नेटवर्कचे संचालन करत आहे. सिडकोच्या 5 एकर जागेवर परस्पर मोठमोठे शेड उभारून ते खाजगी व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर दिले जात आहेत.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)

या परिसरात सुमारे 10 ते 12 बेकायदेशीर वजनकाटे उभारण्यात आले असून, त्याद्वारे रोज मोठ्या प्रमाणावर हप्ता वसुली सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबई पोलिसांनी याच परिसरातील भंगार व्यवसायांच्या आडून चालणाऱ्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता.

कंटेनर गोदामाच्या आगीच्या दुर्घटनेनंतर भीतीचे सावट

काही दिवसांपूर्वीच उरण परिसरातील एका अनधिकृत कंटेनर गोदामाला लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा प्रकारची कोणतीही मोठी दुर्घटना किंवा सुरक्षा यंत्रणांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी सुरक्षा दलांनी आणि सिडको प्रशासनाने या बेकायदेशीर भंगार यार्डांवर त्वरित बुलडोझर फिरवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

(नक्की वाचा-  Malshej Ghat: माळशेज घाटात रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद! काय आहेत पर्यायी मार्ग?)

सिडकोच्या व्हिजिलन्स विभागाचे आश्वासन

अतिसंवेदनशील जेएनपीटी आणि विमानतळ परिसरातील या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत सिडको प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सिडकोच्या दक्षता (व्हिजिलन्स) विभागाचे प्रमुख सुरेश मेंगडे यांनी स्पष्ट केले,  उरण परिसरातील सिडकोच्या जमिनींवरील अतिक्रमण, बेकायदेशीर शेड आणि वजनकाट्यांच्या विषयाची सखोल तपासणी केली जाईल. तपासात दोषी आढळणाऱ्यांवर आणि अतिक्रमणांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल."
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com