सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड ताथवडे परिसरातील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून वायू प्रदूषणाने त्रस्त आहेत. वारंवार पाठ पुरवठा करून देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे अखेर आज या परिसरातील 50 हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांमधील शेकडो रहिवाशांनी वाकड, ताथवडे परिसरात मूक मोर्चा काढला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाकड, ताथवडे भागातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. रस्तावर धुळीचे अक्षरशः थर साचले आहेत. या परिसरात RMC प्लांटमधील सिमेंट मिश्रित धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. अनेकांना श्वसनाचे विकार, डोळ्यांचे त्रास, त्वचारोग वाढले आहेत.
या परिसरातील रस्त्याची स्वच्छता राखली जात नसल्यामुळे धुळीचे अधिकच प्रमाण वाढले आहे.या परिसरात 15 ते 20 मोठ्या सोसायट्यांमध्ये 5 ते 7 हजार रहिवासी राहतात. त्यांच्या आरोग्यावर या प्रदूषणाचा मोठा दुष्परिणाम होत आहे. 3 ते 4 मोठ्या शाळा या भागांत असून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
(Santosh Deshmukh Case : जीवावर उठता का? तो फोन... आपल्यासोबत बरंवाईट होणार हे देशमुखांना कळलं होतं?)
परिसरात अंदाजे 10 ते 15 RMC प्लांट आहेत. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर या परिसरात धुळीचे प्रमाण वाढले आहे. याच परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज या परिसरातील नागरिकांनी मूक मोर्चा काढला.
(नक्की वाचा- Beed News : महादेव मुंडे हत्या प्रकरण; वाल्मीक कराडच्या निकटवर्तीयाची पोलिसांकडून चौकशी)
रहिवाशांच्या मागण्या काय?
- या परिसरातील रस्त्याची दोनवेळा यंत्राद्वारे पाण्याने साफसफाई करण्यात यावी.
- धुळीचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी वॉटर स्प्रे प्रणाली राबविण्यात यावी.
- रस्त्यावरील सिमेंट आणि खडी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यात यावी .
- रस्त्याच्या दुतर्फा झाडे लाऊन त्यांची निगा राखण्यात यावी.