
स्वानंद पाटील, बीड
Beed News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अवादा कंपनी खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातही वाल्मीक कराड अडकण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मीक कराडच्या निकटवर्तीयाची कसून चौकशी पोलिसांनी केली आहे. वाल्मीक कराडचा निकटवर्तीय श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याची दीड तास विशेष पथकाकडून चौकशी झाली आहे.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: 'बोल सुदर्शन घुले बाप..., 'त्या' 15 व्हिडिओंची A to Z स्टोरी; वाचून काळजाचा थरकाप उडेल)
महादेव मुंडे यांचा खून प्लॉटिंगच्या व्यवहारातून झाल्याचा संशय त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या प्रकरणात श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराडचा काही संबंध आहे का? हे तपासले जात आहे.
(नक्की वाचा- Budget Session 2025: फक्त घोषणा, धनंजय मुंडेंनी खरंच राजीनामा दिला का? सभागृहात राडा)
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थापन केलेल्या पथकाने ही चौकशी केली आहे. आतापर्यंत विशेष पथकाकडून महादेव मुंडे खून प्रकरणात 15 मुख्य संशयितांची चौकशी झाली आहे. श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड परळी नगर परिषदेचे माजी पाणीपुरवठा सभापती आहे. त्यामुळे या तपासात काही निष्पन्न झालं तर वाल्मीक कराडवर कारवाईचा फास आणखी आवळला जाऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world