यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Maharashtra Kesari 2026 : 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेची राज्यभरात तुफान चर्चा रंगली आहे. ही स्पर्धा पाहण्याची लाखो कुस्ती प्रेमींची उत्सुकता शिगेली पोहोचली असतानाच एका नव्या वादामुळे चर्चेला उधाण आलं आहे.राज्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्यात वाद सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. आयोजन, मान्यता आणि व्यवस्थापन या मुद्द्यांवरून दोन्ही संघटनांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम स्पर्धेच्या दर्जावर होताना दिसत आहे.
सिकंदर शेखवर 3-0 अशी मात करत अंतिम फेरी गाठली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समारोप सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. फडणवीस उपस्थित राहणार होते,मात्र वादामुळे त्यांनी अंतर ठेवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीतही स्पर्धेतील सामने रंगतदार झाले. माती गटात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिकंदर शेखवर 3-0 अशी मात करत अंतिम फेरी गाठली. तर मॅट गटात नाशिकच्या हर्षवर्धन सदगिरने अवघ्या दोन मिनिटांत 10 गुण मिळवत सोलापूरच्या जय पाटीलचा पराभव केला.
नक्की वाचा >> राज्यातील हॉटेल व्यवसायिकांसाठी आनंदाची बातमी! LPG Gas पुरवठ्याबाबत सरकारने घेतला सर्वात महत्त्वाचा निर्णय
आता महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगिर यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे.मात्र,या थरारक सामन्यांवरही वादाचे सावट कायम आहे.क्रीडा क्षेत्रातील संघटनांमधील संघर्षामुळे स्पर्धेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून खेळाडूंनाही याचा फटका बसत असल्याची चर्चा आहे. यामुळे महाराष्ट्र केसरीसारख्या ऐतिहासिक स्पर्धेची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी संबंधितांनी लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.
नक्की वाचा >> Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार, एका तरुणामुळे रेल्वे सेवा खोळंबली अन्..खळबळजनक व्हिडीओ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world