Pune Metro News : मेट्रोच्या माध्यमातून कोंढवा परिसर 'या' भागाशी जोडला जाणार, CM फडणवीसांची मोठी घोषणा

"कात्रज-कोंढवा मार्गाचे काम लवकरात पूर्ण करण्यात येणार आहे. माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येणार आहे", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

जाहिरात
Read Time: 2 mins
CM Devendra Fadnavis On Pune Metro

CM Devendra Fadnavis On Pune Metro :  "कात्रज-कोंढवा मार्गाचे काम लवकरात पूर्ण करण्यात येणार आहे. माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येणार आहे. शिवाजी नगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता देण्यात आली आहे.स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत आणि पुरंदर विमानतळाशी जोडणाऱ्या प्रस्तावित मेट्रोच्या माध्यमातून या भागाला जोडण्यात येईल",अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्यावतीने कोंढवा बु.येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,आमदार योगेश टिळेकर,भीमराव तापकीर,सुनील कांबळे,चेतन तुपे,मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

"छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला.त्यांनी समतेचे राज्य निर्माण केले.स्त्रियांवर अन्याय,अत्याचार करणाऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा करणारे त्यांचे शासन होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोंढव्याची भूमी आहे.या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होत असल्याचा आनंद होत आहे.पुतळ्यामुळे कोंढवा बु.परिसरासह संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव वाढले आहे",असंही ते म्हणाले.

नक्की वाचा >> सारा अर्जुन का बनली 'धुरंधर'ची हिरोईन? 1300 मुलींमध्ये कशी झाली निवड? डायरेक्टर म्हणाले, "पार्ट 2 मध्ये.."

"मुघलांशी लढाई करुन स्वराज्याचे रक्षण केले"

ज्या काळात मोगलशाही,नीजामशाही,आदिलशाही असे परकीय आक्रमक मराठीभूमी,हिंदुस्थानावर आक्रमण करीत होते. त्यावेळी अनेक राजे आणि राजवाडे मुघलांचे मंडलिक म्हणून आधिपत्य स्वीकारत होते.अशा काळामध्ये  जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली.त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांशी लढाई करुन स्वराज्याचे रक्षण केले.त्यानंतर ताराराणींनी झुंज कायम ठेवत मराठ्यांनी दिल्लीचे तख्तही काबीज केले.अटकेपार झेंडाही मराठ्यांनीच लावला.आम्हाला स्वाभिमान देणारे.महाराष्ट्राचा अभिमान असणारे शिवाजी महाराजांचा सिबीएससीच्या अभ्यासक्रमात 21 पानांचा जाज्वल इतिहासाचा समावेश केला आहे,असंही फडणवीस म्हणाले.

नक्की वाचा >> Good News: चालकांनो! इंटरनेट आणि डेटा नसतानाही नेव्हिगेशन चालणार, 'असं' वापरा Offline Maps