Farmers Loan Waiver Scheme: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी दृष्टीने मोठा निर्णय आज घेण्यात आला. शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत 2 लाख रुपये कर्जमाफीबाबत आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. 52 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीला मान्यता मिळाली आहे. सहकार विभागाकडून लवकरच अटी आणि शर्थीवर परिपत्रक काढण्यात येणार आहे.
Advertisement
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
- मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-3 मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य निधीच्या प्रस्तावास मान्यता.
- रस्त्यांच्या सुधारणेसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँके व न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला दोन्ही बँकाकडून मिळणार प्रत्येकी 8 हजार 700 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य. राज्यातील रस्ते सुधारणा व विकासाला आणखी गती मिळणार.
- हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये सहा महाविद्यालयांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. यामध्ये प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, मुंबई. किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, मुंबई. श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई. ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्ल असोमुल्ल विज्ञान महाविद्यालय, मुंबई व थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई यांचा घटक महाविद्यालये म्हणून समावेश होणार.
Topics mentioned in this article