CM Fadnavis on Kunal Kamra : "कोण गद्दार आणि कोण खुद्दार...", कुणाल कामराचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार

CM Fadnavis on Kunal Kamra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "कॉमेडी करण्याचा अधिकार कुणालाही आहे. मात्र स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

 कॉमेडियन कुणाल कामराने शिंदे गटाच्या बंडाची खिल्ली उडवत एकनाथ शिंदे यांचा 'गद्दार' म्हणून उल्लेख केला. कामराच्या विडंबनात्मक गाण्याने शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनतेने दाखवून दिले आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "कॉमेडी करण्याचा अधिकार कुणालाही आहे. मात्र स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. कामराला हे माहीत पाहिजे, 2024 साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कुणाकडे गेला हे जनतेने ठरवलं आहे."

(नक्की वाचा-  एकनाथ शिंदेंवरच नाही तर पंतप्रधान मोदींवरही गाणं; कुणाल कामराची 'ही' सहा गाणी व्हायरल)

"अशाप्रकारे खालच्या दर्जाच्या कॉमेडी करून राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री ज्यांच्याबद्दल जनतेमध्ये आदर आहे त्यांचा अनादार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. अशाप्रकारे अपमानिक करण्याचं काम कुणी करेल तर हे सहन केले जाणार नाही", असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 

(नक्की वाचा- Kunal kamra : एक गाणं अन् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा संताप, कुणाल कामराचा 4 शब्दांचं ट्वीट चर्चेत)

"कुणाल कामरांनी माफी मागितली पाहिजे. ते जे संविधानाचं पुस्तक दाखवतं आहेत, त्यांनी ते वाचलं असेल तर त्यांना माहिती असेल, संविधानानेच सांगितलं आहे स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे", असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.  

Topics mentioned in this article