जाहिरात

Ladki Bahin e-KYC: 'लाडकी बहीण'साठी e-KYC करताना फसवणुकीचा धोका; कशी काळजी घ्याल?

Ladki Bahin Yojana, E-KYC: फसवणुकीपासून वाचण्यासाठी, ई-केवायसी फक्त सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरच करावी. यासाठी सरकारने ladakibahin.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाइट जाहीर केली आहे.

Ladki Bahin e-KYC: 'लाडकी बहीण'साठी e-KYC करताना फसवणुकीचा धोका; कशी काळजी घ्याल?
Photo - Gemini AI

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत आता e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना दर महिन्याला मिळणारी 1500 रुपयांची मदत सुरू ठेवण्यासाठी पुढील दोन महिन्यांत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. हा एक महत्त्वाचा टप्पा असला तरी, अनेक बनावट वेबसाइट्समुळे फसवणुकीचा धोका वाढला आहे.

बनावट वेबसाइटपासून सावध राहा

गूगलवर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सर्च केल्यास काही बनावट वेबसाइट्स समोर येत आहेत. 'hubcomut.in' अशा काही संशयास्पद वेबसाइट्सवर ई-केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. जर तुम्ही चुकून या बनावट वेबसाइटवर तुमची माहिती दिली, तर तुमच्या बँक खात्याची माहिती चुकीच्या व्यक्तींच्या हातात जाऊ शकते. यामुळे तुमच्या बँक खात्यातील पैसे चोरीला जाण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी, ई-केवायसी फक्त सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरच करावी. यासाठी सरकारने ladakibahin.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाइट जाहीर केली आहे.

(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna e-KYC : पती-वडील हयात नसतील तर काय? फॉर्म एडिट कसा कराल? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर)

ई-केवायसी प्रक्रिया

1. ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

2. 'ई-केवायसी' ऑप्शनवर क्लिक करा.

3. तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड नंबर, उत्पन्नाची माहिती आणि आधार नंबर भरा.

4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

5. माहिती सबमिट करून कन्फर्मेशनची वाट पहा.

(नक्की वाचा - Mazi Ladki bahin yojna :एकाच Video मध्ये e-kyc संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरं; आदिती तटकरेंनी VIDEO केला शेअर)

ई-केवायसी ही एक डिजिटल प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुमच्या ओळखीची आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते. सरकारने ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे, कारण यापूर्वी अनेक बनावट लाभार्थी योजनेचा गैरफायदा घेत होते. आता प्रत्येक महिलेला दरवर्षी ई-केवायसी करावी लागेल, जेणेकरून योजनेचा पैसा गरजू महिलांपर्यंत पोहोचेल. तुमच्या एका चुकीमुळे मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते, त्यामुळे ई-केवायसी करताना केवळ अधिकृत वेबसाइटचा वापर करा.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com