जाहिरात

Ladki Bahin Yojna e-KYC : पती-वडील हयात नसतील तर काय? फॉर्म एडिट कसा कराल? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

e-KYC दरम्यान तुम्हाला आलेल्या अडचणी प्रश्न उत्तरांच्या स्वरुपाच समजून घ्या.

Ladki Bahin Yojna e-KYC : पती-वडील हयात नसतील तर काय? फॉर्म एडिट कसा कराल? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

Mukhyamantri-Majhi Ladki Bahin Yojana e-KYC error  : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला e-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या वापर करणारे नियमांची पायमल्ली करीत असल्याचं समोर आल्यानंतर प्रक्रिया अधिक कडक करीत प्रत्येक लाभार्थी महिलेला e-KYC करण्याचं अनिवार्य करण्यात आलं. यासाठी दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. 

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 21 सप्टेंबरला चार्टफ्लो शेअर केला असून e-KYC करण्याची प्रत्येक स्टेप सविस्तरपणे सांगितली आहे. दरम्यान तरीही अनेक महिला लाभार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

यंदा E-KYC दरम्यान पती किंवा वडिलांचा आधारक्रमांक  अनिवार्य करण्यात आला आहे. हा आधारक्रमांक टाकल्यानंतर मोबाइल आलेला ओटीपी टाकून E-KYC ची पुढची स्टेप पूर्ण होणार आहे. दरम्यान याबाबत अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC दरम्यान येणाऱ्या अडचणी.. प्रश्न आणि उत्तरांच्या रुपात...

१. अनेक महिलांच्या मोबाइलवर ओटीपी येत नाही किंवा साइटवर लॉग इन करण्यात अडचणी येत असेल तर अशा महिलांनी काय करावं?
सुरुवातीला आपला वायफाय किंवा नेटवर्क चेक करून घ्यावं. चांगलं नेटवर्क असेल अशा ठिकाणी ईकेवायसी करावी. 
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सध्या लाखोंमध्ये लाभार्थी महिला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळवर ईकेवायसी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी संकेतस्थळावरील लोड वाढला आहे. त्यामुळे वारंवार एरर येत आहे. रात्रीच्या वेळी लाभार्थी महिला त्यांच्या घरी लॉग इन करून तपासू शकतात. 

Latest and Breaking News on NDTV

२. E-KYC पूर्ण झाल्यानंतर सबमिट केलं. पण त्यात पुन्हा काही दुरुस्ती करायची असेल तर कशी करता येईल. 

E-KYC चा फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर त्यात पुन्हा एडिट होत नसल्याचं दिसत आहे. यावर राज्य सरकारी पातळीवर चाचपणी सुरू आहे. हा बदल स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविकांकडे द्यावा की त्यात तंत्राज्ञानाच्या माध्यमातून महत्त्वाचे बदल करावेत याबाबतच सरकारी पातळीवर विचारविनिमय सुरू आहे. 

३. ज्या महिलांचे पती आणि वडिलांचं निधन झालं असेल.  अशा महिलांनी कोणाच्या आधारकार्डवरील नंबर नमूद करावा. किंवा ज्या महिलेने घटस्फोट घेतला असेल किंवा पतीचं निधन झालं असेल. या महिलेचे वडीलही हयात नसतील तर अशा महिलांनी कोणाच्या आधारकार्डाचा क्रमांक E-KYC दरम्यान नमूद करावा. अशा महिलांनी E-KYC कशी पूर्ण करावी. 

Mazi Ladki bahin yojna :एकाच Video मध्ये e-kyc संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरं; आदिती तटकरेंनी VIDEO केला शेअर

नक्की वाचा - Mazi Ladki bahin yojna :एकाच Video मध्ये e-kyc संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरं; आदिती तटकरेंनी VIDEO केला शेअर

अनेक महिलांकडून अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र वर प्रश्नात दिल्याप्रमाणे परिस्थिती असेल तर अशा महिलांना काही वेळ वाट पाहावी लागू शकते. महिला आणि बालकल्याण विभागातर्फे याबाबत चाचपणी केली जात आहे. या तांत्रिक गोष्टी सोडविण्यासाठी आणखी काय केलं जाऊ शकतं याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे महिलांना फार संभ्रमात न पडता काही दिवस वाट पाहणं आवश्यक आहे. २३ सप्टेंबरनंतर राज्य सरकारकडून यावर उपाययोजना सुचविल्या जाणार असल्याची माहिती आहे. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com