जाहिरात

CNG Prices Hike: महागाईचा भडका! दिल्ली मुंबईसह प्रमुख शहरांत CNG महागला, पाहा नवे दर

सीएनजी महागल्यामुळे आता ऑटो, टॅक्सी आणि टेम्पोचे भाडे वाढण्याची दाट शक्यता आहे.

CNG Prices Hike: महागाईचा भडका! दिल्ली मुंबईसह प्रमुख शहरांत CNG महागला, पाहा नवे दर
  • दिल्ली-एनसीआरसह विविध शहरांमध्ये सीएनजीच्या दरात तीन रुपयांची वाढ झाली आहे
  • इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने दिल्लीत सीएनजीचा दर ७९.०९ रुपयांवरून ८०.०९ रुपये प्रति किलो केला आहे
  • नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीचा दर दिल्लीपेक्षा आठ रुपये जास्त आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

गेल्या तीन दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ झाल्यानंतर आता सर्वसामान्यांच्या खिशाला सीएनजीचीही झळ बसणार आहे. दिल्ली-एनसीआरसह देशातील विविध शहरांमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 3 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच गॅस कंपन्यांनी सीएनजीचे दर 2 रुपयांनी वाढवले होते, त्यातच आज रविवारी पुन्हा 1 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. या भाव वाढी मुळे सर्व सामान्यांचा प्रवास ही महागणार हे निश्चित आहे. नवे दर त्वरीत लागू करण्यात आले आहेत. 

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (IGL) जाहीर केलेल्या नवीन दरपत्रकानुसार, दिल्लीत आता सीएनजी 79.09 रुपयांवरून 80.09 रुपये प्रति किलो झाला आहे. नोएडा आणि गाझियाबादमध्ये हा दर दिल्लीपेक्षा 8.61 रुपयांनी जास्त म्हणजेच 88.70 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. दुसरीकडे, मुंबईत सध्या सीएनजी 84 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. पुणे पिंपरी चिंचवड मध्ये सीएनजी 92.25 तर नाशिकमध्ये सीएनजी 93.65 पैशांनीा मिळणार आहे. 

नक्की वाचा- Mumbai Crime: खळबळजनक! काँग्रेस नगरसेविकेकडून महिलेचे अपहरण, अनैतिक संबधाच्या संशयातून कृत्य

सीएनजीच्या या दरवाढीमुळे कॅब आणि ऑटो रिक्षाचा प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. मुंबईतील टॅक्सी रिक्षा चालक आधीच भाडेवाढीसाठी आक्रमक झाले आहेत. दिल्लीतही ओला, उबर आणि रॅपिडोच्या कॅब चालकांनी कमिशन आणि भाडे वाढवण्याची मागणी करत संप पुकारला आहे. जर कंपन्यांनी मागण्या मान्य केल्या, तर त्याचा थेट बोजा ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.

Pandharpur News: विठुरायाच्या मंदिरात दर्शनाचा काळाबाजार! ऑडियो क्लीपने खळबळ; थेट UPIद्वारे वसुली

महागाई थांबायचे नाव घेत नाहीये. आधी पेट्रोल-डिझेल आणि आता सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. गेल्या तीन दिवसांत दिल्ली-एनसीआरसह अनेक शहरांमध्ये सीएनजी ३ रुपयांनी महाग झाला आहे. कंपन्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही सीएनजीच्या दरात १ रुपयाची वाढ करून सर्वसामान्यांना झटका दिला आहे. सीएनजी महागल्यामुळे आता ऑटो, टॅक्सी आणि टेम्पोचे भाडे वाढण्याची दाट शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com