जाहिरात

Pandharpur News: विठुरायाच्या मंदिरात दर्शनाचा काळाबाजार! ऑडियो क्लीपने खळबळ; थेट UPIद्वारे वसुली

या ऑडिओ क्लिपमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी प्रति व्यक्ती दोनशे रुपये याप्रमाणे पाच भाविकांकडून एक हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे.

Pandharpur News: विठुरायाच्या मंदिरात दर्शनाचा काळाबाजार! ऑडियो क्लीपने खळबळ; थेट UPIद्वारे वसुली

संकेत कुलकर्णी, पंढरपूर:

Pandharpur Darshan Scam:  गोरगरिबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठुरायाच्या दर्शनासाठी काळाबाजार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपुरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी प्रती भाविक दोनशे रुपये  घेतले जात असल्याची कथित ऑडियो क्लीप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला असून याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Nashik News: कृपया लक्ष द्या! नाशिकच्या गोदाघाट परिसरातील घाटावर नागरिकांना नो एन्ट्री, किती महिने राहणार बंद?

विठुरायाच्या दरबारात दर्शनाचा काळाबाजार

समोर आलेल्या माहितीनुसार, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शनाबाबत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विठ्ठल दर्शनासाठी थेट काळाबाजार सुरू असल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी प्रति व्यक्ती दोनशे रुपये याप्रमाणे पाच भाविकांकडून एक हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे. या घटनेमुळे मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि व्हीआयपी दर्शन पासेसच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पंढरपुरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन काही तथाकथित दलाल आणि एजंट सक्रिय झाले आहेत. व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये एका व्यक्तीने पाच भाविकांना विठ्ठल दर्शन घडवून आणण्यासाठी एक हजार रुपयांची थेट डील केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे पैसे रोख स्वरूपात न घेता 'फोन पे' (PhonePe) या डिजिटल माध्यमाद्वारे ऑनलाईन स्वीकारण्यात आले आहेत. पैशांचे ट्रान्झॅक्शन यशस्वी झाल्याचा उल्लेखही या संभाषणात करण्यात आला आहे.

भाविकांचा संताप 

दरम्यान, या ऑडिओ क्लिपमधील आवाज पंढरपूर शहरातीलच एका कथित समाजसेवकाचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. समाजसेवेचा बुरखा पांघरून भाविकांची आर्थिक लूट करणारी ही टोळी नेमकी कशी कार्यरत आहे, याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपची सत्यता किंवा त्यातील आवाजाची अधिकृत पुष्टी अद्याप कोणत्याही शासकीय पातळीवर झालेली नाही.
 

नक्की वाचा >>NEET पेपरफुटीचं लातूर-पुणे कनेक्शन नेमकं काय? पी.व्ही.कुलकर्णी खरा मास्टरमाईंड? वाचा INSIDE STORY

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com